खरी आणि न्‍याय्‍य राष्‍ट्रीयता !

हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाऱ्यांचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे ‘एकनिष्ठ हिंदू जातीय’ म्हणून भांडवल घेण्यात आम्ही भूषणच मानू; कारण आमच्या मते अशी जातीनिष्ठता म्हणजेच खरी आणि न्याय्य अशी राष्ट्रीयता होय !

सडामिर्‍या (रत्नागिरी) येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरीमध्ये सडामिर्‍या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी ‘ने मजशी ने परत मातृभूमीला’ या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या , हा स्तंभ सद्य:स्थितीत या ठिकाणी दिसत नाही.

वीर सावरकर उवाच

एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्‍या आदी प्राणी जरी रहात असले, तरी ते घर त्‍यांचे नाही, तर ते त्‍या घरधन्‍याचे असते, त्‍याप्रमाणे या देशात जरी कितीही इतर लोक असले, तरी हा देश हिंदूंचाच आहे, हिंदुस्‍थान आहे !

म्हैसुरू मुक्त विद्यापिठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने होणारा कार्यक्रम रोखण्याचा विद्यापिठाचा अयशस्वी प्रयत्न !

कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यात टिपू सुलतान उदो उदो होणार, तर सावरकरांना वाळीत टाकण्याचाच प्रयत्न होणार, यात शंका नाही ! यावरून तरी काँग्रेसला निवडून चूक केल्याचे राज्यातील हिंदूंच्या लक्षात आल्यास तो सुदिन ठरेल !

राष्ट्र आणि धर्म हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत ! – दुर्गेश जयवंत परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

श्री लक्ष्मीनारायण देवस्थान कल्याणच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

वीर सावरकर उवाच !

अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारतविजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते.

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.

हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी तुम्‍हा सर्वांना दायित्‍व घ्‍यावे लागेल ! – मंगलप्रभात लोढा

१०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा ? याकरता भागोजीशेठ कीर यांनी पतित पावन मंदिर उभारले. याच मंदिरात वीर सावरकर यांनी सहभोजन चालू केले. वीर सावरकर यांनी ‘स्‍वातंत्र्य मिळण्‍यापूर्वी भारतमातेला परकीय शक्‍तींपासून मुक्‍त करीन’, अशी शपथ घेतली; कारण त्‍याविना भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार नाही, हे त्‍यांना ठाऊक होते.

सप्तबंदीचे म्युरल आणि रत्नागिरीचा इतिहास लिहिला जातोय ! – अधिवक्ता बाबा परुळेकर

सावरकर म्हणाले होते,  ‘कितीही संकटे येऊ देत, जोपर्यंत बुद्धी, वाणी आणि लेखणी या गोष्टी माझ्यापाशी आहेत, तोपर्यंत कुणीही मला भारतमातेला मुक्त करण्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाहीत.’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर – सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिज येणार !

‘‘या ‘वेब सीरिज’च्या माध्यमातून वीर सावरकर यांचे विचार, शौर्य, बलीदान युवकांपुढे आणण्याचा प्रयत्न असेल.’’