मुंबई – भिडेगुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहेत, मग राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अतिशय गलिच्छ विधाने करतात, त्याचाही काँग्रेसने निषेध केला पाहिजे. त्या वेळी मात्र ते मिंधे होतात, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी गांधीजींविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस की सफाई- ‘महात्मा गांधी पर विवादित बयान देने वाले संभाजी भिड़े का बीजेपी से नहीं संबंध’ https://t.co/7s13oQ9Tc6
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) July 30, 2023
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महानायकाविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे पूर्णपणे अनुचित आहे. असेे वक्तव्य भिडे गुरुजींसह अन्य कुणीही करू नये. यामुळे कोट्यवधी लोकांच्या मनात निश्चितच संताप निर्माण होतो. लोक महात्मा गांधी यांच्याविरुद्ध बोललेले कधीही सहन करणार नाहीत. राज्य सरकारकडून या प्रकरणी उचित कारवाई केली जाईल. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचे काहीही कारण नाही.’’