भारतीय नागरिकाला संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी घोषित करण्याचा पाकचा प्रयत्न भारताने उधळला !  

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला.

धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही ! – भारत

धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही. केवळ ‘अब्राहमिक’ धर्मांविरुद्धच नव्हे, तर शीख, बौद्ध आणि हिंदु धर्मासह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष अन् हिंसाचार यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करायला हवेत.

वर्ष २०२१ मध्ये जगभरातील १० कोटींपेक्षा अधिक लोक विस्थापित – संयुक्त राष्ट्रे

या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये चीनमध्ये ६० लाख, तर फिलिपिन्समध्ये ५७ लाख लोक विस्थापित झाले. गेल्या १० वर्षांत घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांची संख्या वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाकचे समर्थन नाही ! – पाकचे स्पष्टीकरण

पाकने म्हटले की, पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा झाली; मात्र त्यात भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व देण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही.

आम्ही सर्व धर्मांचा मान राखतो ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी म्हटले की, मी नूपुर शर्मा यांच्याविषयीचे वृत्त वाचले आहे; मात्र त्यांचे विधान ऐकलेले नाही.

तुर्की देश आता ‘तुर्किये’ या नावाने ओळखला जाणार !

याच आधारावर भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत’ असे नामकरण करावे, असेच बहुसंख्य भारतियांना वाटते !

काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सोडवला पाहिजे ! – तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगन यांचे फुकाचे बोल

काश्मीरचा प्रश्‍न हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तो कसा आणि कुणी सोडवावा, हे सांगण्याचा प्रयत्न एर्दोगन यांनी करू नये, अशी समज भारताने त्यांना दिली पाहिजे !

अफगाणिस्तामधील अल् कायदाची साहाय्यक आतंकवादी संघटना भारतात घातपात करण्याच्या सिद्धतेत ! – संयुक्त राष्ट्रे

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्याने ते हिंदूंच्या भारतावर सातत्याने आक्रमण करण्याच्या सिद्धेतत असतात, हेच पुनःपुन्हा सिद्ध येते !

हवामान पालटामुळे वर्ष २०३० पासून प्रतिवर्षी करावा लागणार ५६० संकटांचा सामना ! – संयुक्त राष्ट्रे

हवामान पालट प्रदूषणामुळे निर्माण झाला असून हे प्रदूषण विज्ञानाच्या अतिरेकामुळे झाले आहे. गेल्या १०० वर्षांत विज्ञानाद्वारे बरीच प्रगती केल्याचे कितीही सांगितले जात असले, तरी ती प्रगती विनाशाला आमंत्रण देत आहे, हेच यातून लक्षात येते !

जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मार्च मासामध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोचल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. ८ एप्रिल या दिवशी प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न आणि कृषी संघटने’च्या मासिक अन्न किंमत निर्देशांकानुसार स्वयंपाकाचे तेल, धान्य आणि मांस हे सर्वकालीन उच्चांकावर पोचले.