मदरशांमध्ये शिक्षण घेणारे महिलांविषयी नकारात्मक विचार करतात ! – ‘युनेस्को’चा अहवाल

नवी देहली – मदरशांमध्ये शिकलेले महिलांविषयी नकारात्मक विचार करतात. त्यांना वाटते की, मुलांचे संगोपन करणे, इतकेच पत्नींचे काम केवळ आहे; कारण अल्लाला मुलांची संख्या वाढवायची आहे. अशा प्रकारे या लोकांनी मोठ्या कुटुंबाचे समर्थन केले आहे, असे संयुक्त राष्ट्रांची संस्था ‘युनेस्को’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालात पुढे म्हटले आहे की, पारंपरिक मदरशांतील शिक्षकांचे कुटुंब मोठे असते. मदरशांच्या वाढत्या संख्येमुळे खेडेगावातील मुसलमान मुलींच्या शिक्षणात वाढ झाली आहे; मात्र हे शिक्षण धर्माच्या आधारावर आहे. मदरशातील शिक्षण हे महिला आणि पुरुष यांच्यातील भेदाला महत्त्व देते. सौदी अरेबिया, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि मलेशिया येथील अभ्यासातून हे लक्षात आले आहे. मदरशांतील शिक्षकांकडे महिला आणि पुरुष यांच्यातील भेदावर मार्ग काढण्याचे  प्रशिक्षण नाही.

संपादकीय भूमिका

‘युनेस्को’ने सत्य तेच सांगितले आहे. मदरशांमध्ये अनेकदा मुली आणि मुले यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येत असते. त्यामुळे भारतात मदरशांद्वारे देण्यात येणार्‍या शिक्षणावर बंदी घालण्याविषयी विचार झाला पाहिजे !