जिहादी आतंकवादी कारवायांसाठी लहान मुलांचा वापर चिंताजनक !  

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिपादन

भारताचे राजदूत आर्. रवींद्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – जिहादी आतंकवादाच्या कारवायांमध्ये मुलांच्या वाढत्या सहभागावरून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलतांना चिंता व्यक्त केली आहे. या बैठकीत या परिषदेकडून एक अहवाल सादर करण्यात आला. यात म्हटले आहे की, २५ टक्के मुलांचा मृत्यू भूसुरूंग, स्फोटक उपकरणे आणि युद्धाच्या वेळी शिल्लक राहिलेली स्फोटके यांच्या अवशेषांच्या स्फोटांमुळे मृत्यू होतो.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत भारताचे राजदूत आर्. रवींद्र यांनी म्हटले की, जागतिक महामारीमुळे शाळा बंद होते. त्यामुळे आतंकवादी संघटनांनी त्यांच्या कारवायांसाठी लहान मुलांना सहभागी करून घेतले. या संघटना मुलांचा बुद्धीभेद करून त्यांचा वापर आतंकवाद्यांच्या रक्षणासाठी ढाल म्हणून करत आहेत. मुलांचे रक्षण आणि आतंकवादाला विरोध करणे यांसाठी सदस्य देशांनी त्यांचे दायित्व पार पाडण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे.