संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित !

रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला.

रशियावर तात्काळ कार्यवाही करा किंवा संघटनेला विसर्जित करा !

संयुक्त राष्ट्रांनी जगातील एकतरी समस्या सोडवली आहे का ? भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेऊन ७४ वर्षे झाली आहेत; मात्र त्यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे ‘झेलेंस्की यांना जे वाटते, तेच आता करण्याची आवश्यकता आहे’, अशी आता जगभरातून मागणी झाली पाहिजे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनविषयीच्या रशियाच्या प्रारूपावरील मतदानात भारत तटस्थ

चीनने या प्रारूपास पाठिंबा दिला. दुसरीकडे इस्रायलने रशियाची भीती दाखवून ‘पेगासस’ हे गुप्तचर ‘सॉप्टवेअर’ युक्रेनला देण्यास नकार दिला आहे.

जगातील १४६ सर्वांत आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारत १३६ व्या, तर पाकिस्तान १२१ व्या स्थानी !

संयुक्त राष्ट्रांचे अजब निरीक्षण !
पाश्‍चात्त्य देशांचा प्रभाव असणार्‍या संयुक्त राष्ट्रांकडून बनवण्यात येणार्‍या अशा सूचींद्वारे नेहमीच भारताला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात येते !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युक्रेन सोडून जाणार्‍यांचा आकडा २० लाखांच्या पार ! – संयुक्त राष्ट्रे

युद्ध जसे अधिक भडकेल, तसे गरीब युक्रेनियन नागरिकही देश सोडून पलायन करतील. ही स्थिती अधिक चिंताजनक असेल. सर्व युरोपीय राष्ट्रांनी मानवतावादी भूमिका निभवावी, असेही ग्रँडी यांनी युरोपीय राष्ट्रांना आवाहन केले आहे.

पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का? ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाश्‍चात्त्य देशांना प्रश्‍न

युरोपीयन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक प्रमुखांनी १ मार्च या दिवशी संयुक्त पत्राद्वारे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारणसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते.

रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव न्यून करण्याला प्राधान्य द्यावे ! – भारत

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढणे, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. हा तणाव न्यून करण्याला त्वरित प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने बोलावलेल्या बैठकीत भारताने मांडली.

(म्हणे) ‘पत्रकार राणा अय्यूब यांचा छळ थांबवा !’ – संयुक्त राष्ट्रे, जिनेव्हा

संयुक्त राष्ट्रांकडून भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या एका हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी महिला पत्रकाराला अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा होणारा प्रयत्न त्याच्या प्रतिष्ठेला लज्जास्पद आहे !

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना संरक्षण द्या !’

हिजाब प्रकरणी इस्लामी देशांच्या संघटनेची मागणी
भारतातील अंतर्गत प्रश्‍नात अशा संघटनांनी नाक खुपसू नये, असे भारताने ठणकावले पाहिजे !

… तर रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – अमेरिका

अमेरिकेचा युक्रेन प्रश्‍नावरून रशियाला इशारा !