मुंबई येथील श्री. अमर सांगळे यांना तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या दर्शनाला जातांना आणि तेथे गेल्यावर आलेल्या अनुभूती
तुळजापूर येथे गेल्यावर श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली. पुजारी आम्हाला देवीच्या दर्शनासाठी गाभार्यात घेऊन जात होते. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच आम्हाला देवीकडे घेऊन जात आहेत’, असे मला वाटले.