हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ घोषित !

३ जुलैला पुरस्कार सोहळा !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

पुणे – ‘पुणे सार्वजनिक सभा’ या संस्थेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘सार्वजनिक काका पुरस्कार – २०२६’ हा यंदा हिंदुत्वासाठी व्यापक कायदेशीर लढाईत अनेकांगी योगदान देणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना घोषित झाला आहे. विधीज्ञ नंदकुमार फडके यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. ३ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, सणस मैदानासमोर, हॉटेल कल्पनाजवळ, सदाशिव पेठ, पुणे येथे शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘पुणे सार्वजनिक सभा’ १५० वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.