भारतीय विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली !

ओटावा (कॅनडा) – या वर्षी कॅनडामध्ये येणार्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट झाली आहे. कॅनडाला येणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून आली आहे. भारतीय विद्यार्थी आता कॅनडाऐवजी इतर देशांना प्राधान्य देत आहेत. सरकारच्या स्थलांतर धोरणामुळे विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यावर भाष्य करताना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले की, त्यांचे सरकार स्थलांतरावर नियंत्रण मिळवत असतांनाच अधिक शाश्वत आणि विश्वासार्ह स्थलांतर प्रणाली विकसित करत आहे. यामुळे भविष्यात एक चांगली प्रणाली निर्माण होईल.
१. वर्ष २०२३ मध्ये एकूण कॅनेडातील विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतियांचे प्रमाण ५१.६ टक्के होते. आता कॅनडातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा वाटा ८.१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
२. ‘इमिग्रेशन, रेफ्युजीज अँड सिटीझनशिप कॅनडा’ (आय.आर्.सी.सी.) या संघटनेच्या अहवालानुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कॅनडामध्ये येणार्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट झाली आहे. या काळात येणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १ लाख ५० सहस्रांहून अधिकची घट झाली.
३. कॅनडातील नवीन नियमांमुळे अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक झाली आहे. या नियमांनुसार विद्यार्थ्यांना लवकर अर्ज करणे, आपली भक्कम आर्थिक क्षमता सिद्ध करणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खर्याचा रस्ता दाखवा ! – डॉ. विवेक बेल्हेकर
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त