तहसीलदार आणि संयुक्त उप-निबंधक पदावर कार्यरत थुम्माकोम्मा सुचरिता

भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागाच्या एका निलंबित महिला अधिकार्याची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणली. चौकशीच्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अधिकार्याची २० कोटी रुपये किमतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता, तसेच रोख रक्कम अन् मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने आढळून आले.
२४ जूनला विभागाने भाग्यनगरजवळ असलेल्या शमीरपेटच्या निलंबित तहसीलदार आणि संयुक्त उप-निबंधक थुम्माकोम्मा सुचरिता यांच्याविरुद्ध ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यां’तर्गत बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा नोंदवला.
सुचरिता आधीपासून कारागृहात !
सुचरिता या लाचखोरीच्या एका प्रकरणात आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी एका शासकीय कर्तव्याच्या बदल्यात ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यांपैकी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना त्यांना गेल्या महिन्यात २६ मे या दिवशी रंगेहाथ अटक करण्यात आली होती.
विभागाने अनेक ठिकाणी घातलेल्या धाडींत काय सापडले ?
विभागाच्या अधिकार्यांनी सुचरिता यांचे हिमायतनगर येथील निवासस्थान आणि त्यांचे नातेवाईक, सहकारी, तसेच इतर ३ ठिकाणांवर एकाच वेळी धाडी घातल्या. त्यातून पुढील गोष्टी सापडल्या :
१. कीसारा आणि खानामत येथे भूमीचे दोन भूखंड
२. शहरातील विविध भागांत ३ आलिशान सदनिका
३. सिद्दिपेट जिल्ह्यातील दामराकुंटा गावात २ एकर १७ गुंठे शेतजमीन
४. २ चारचाकी गाड्या
५. १ कोटी २ लाख रुपये किमतीचे सोने अन् हिर्यांचे दागिने
६. १२ लाख रुपये रोख आणि बँक खात्यांमध्ये जमा असलेले ३८ लाख रुपये
७. १२ एकर शेतजमिनीची कागदपत्रे
जर या सर्व मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य मोजले, तर ते सुमारे २० कोटी रुपये भरेल.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati