Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !

  • मोहरमच्या मिरवणुकीद्वारे हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

  • ‘बघा, आम्ही पुन्हा आलो’ असा संदेशही लिहिला !

उज्जैन (मध्यप्रदेश) – बडनगर येथे २३ जूनच्या रात्री अडान गल्लीतून काढण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत भूमीपासून ४० फूट वर हवेत एक चारचाकी वाहन लटकवून त्याचा जाणीवपूर्वक स्फोट करण्यात आल्याची धक्कादायक घटना येथे घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. हे चारचाकी वाहन क्रेनच्या साहाय्याने ४० फूट उंचीवर लटकवण्यात आले होते. त्यावर दोन युवक उभे राहून लाल झेंडे फडकवत होते. यानंतर स्फोट घडवून चारचाकी उडवून देण्यात आली. या चारचाकीवर ‘ले फिर आ गए’ (बघा, आम्ही पुन्हा आलो) असे लिहिले होते. (हिंदूबहुल भारतात ‘दहशत’ कोण पसरवतात हिंदु कि मुसलमान ?, हे यावरून उघड होते ! – संपादक)

१. व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर हरिद्वारचे संत स्वामी शिवानंद गिरि यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी सामाजिक माध्यमावर लिहिले, ‘‘या व्हिडिओद्वारे जणू ‘आम्ही काफिरांच्या (इस्लाम न मानणार्‍यांच्या) गाड्या अशाच प्रकारे उडवून देऊ’, असा संदेश देण्यात आला आहे.’’

२. ‘हिंदु जागरण मंच’च्या रितेश माहेश्वरी यांनी सांगितले की, मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी एका मोठ्या क्रेनवर चारचाकी लटकवण्यात आली होती. त्यावर अनेक आक्षेपार्ह फलक लावण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने अन्वेषण करावे.

४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

उज्जैनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक करनदीप सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी मिरवणुकीचे आयोजक शोएब खान, गाडीवर झेंडे फडकवणारे तालीम खान आणि जाहिद खान, क्रेनचा मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लवकरच चौघांना अटक करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

  • ही उघड उघड चिथावणी नव्हे का ? यातून धर्मांध मुसलमानांना नेमका काय संदेश द्यायचा आहे ?, हे हिंदूंनी जाणावे !
  • हवेत गाडी लटकत असतांना पोलीस झोपा काढत होते का ? त्यांनी यावर आक्षेप घेऊन हा प्रकार रोखला का नाही ? भाजपशासित मध्यप्रदेशात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे मानवाधिकारवाले, निधर्मीवादी, साम्यवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना भारतातील मुसलमानांची ही झुंडशाही दिसत नाही का ?