देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !

नवी देहली – देशभरातील विविध राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये धर्मांध मुसलमान युवकांनी हिंदु मुलींची फसवणूक केल्याचे, त्यांच्यावर धर्मांतरसाठी दबाव आणल्याचे, तसेच त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

१. झारखंड

झारखंडमधील पलामू येथे अन्सारी नावाच्या मुसलमानाने उत्तरप्रदेशातील एका हिंदु तरुणीला स्वतःचे ‘राजा’ नाव सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने लग्नाचे आमीष दाखवून पीडित हिंदु तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिला धमकावून तिचे शोषण चालू केले. ॲमेझॉनमध्ये काम करणार्‍या या तरुणीला नंतर सत्य परिस्थिती समजली. त्यानंतर तिने महंमदगंज पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

२. मध्यप्रदेश

बालेहन्नूर येथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण करून तिच्याशी लग्न केल्याच्या आरोपावरून आसाममधील हबी रहमान (वय २१ वर्षे) या मुसलमान कामगाराला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

३. उत्तराखंड

डेहराडून येथे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये (पुरुष आणि स्त्री यांनी विवाह न करता एकत्र रहाणे) आढळलेल्या २ हिंदु  महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ‘३ मुसलमान तरुणांनी या मुलींना फूस लावून पळवले होते. मुसलमान तरुणांनी त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि धमकावून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप बजरंग दलाने केला आहे. आरोपी तरुणांच्या भ्रमणभाषमध्ये या मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) परिधान केलेली छायाचित्रे सापडल्याचे वृत्त आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदु मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या लव्ह जिहादच्या घटना प्रतिदिन घडत असतांना कुठलेही सरकार त्या रोखण्याचा प्रयत्न करत नाहीत, हे लक्षात घ्या !