मुंबई येथील श्री. अमर सांगळे यांना तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या दर्शनाला जातांना आणि तेथे गेल्यावर आलेल्या अनुभूती

श्री. अमर सांगळे

१. ‘घरासंबंधी अनेक अडचणी येत असतांना एका व्यक्तीने आम्हाला कुलदेवीचे दर्शन घेण्यास सांगितले होते. नंतर कोणतीही अडचण न येता लगेच आमचे कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन झाले. गाडीने प्रवास करतांना माझ्या मनात विचार आला, ‘एखादा पक्षी किंवा प्राणी ‘शुभसंकेत’ म्हणून दिसावा.’ थोड्याच वेळात मला मोर दिसला.

२. तुळजापूर येथे गेल्यावर श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली. पुजारी आम्हाला देवीच्या दर्शनासाठी गाभार्‍यात घेऊन जात होते. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच आम्हाला देवीकडे घेऊन जात आहेत’, असे मला वाटले. आम्हाला अगदी जवळून देवीचे दर्शन झाले. त्या वेळी गाभार्‍यात इतर कुणीही भक्त नव्हते.

३. मंदिराच्या बाहेर आल्यावर कळसाचे दर्शन घेतांना कळसाच्या ठिकाणी मला श्री दुर्गादेवीचे दर्शन झाले आणि तेथे चालतांना ‘पायाखालचे काहीतरी (त्रासदायक) नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.

४. मंदिराच्या आवारात बसून नामजप करतांना कळसाकडे पाहिल्यावर मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे दर्शन झाले.’

– श्री. अमर सांगळे, मुंबई (२६.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक