बलुच नेत्याने पाकिस्तानला करून दिली जाणीव !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा, अशी जाणीव बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानला करून दिली. पाकिस्तान बलुचिस्तानमधील नागरिकांचे बलपूर्वक अपहरण आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन करत असल्याच्या विरोधात मेंगल येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
मेंगल पुढे म्हणाले, ‘‘आम्ही तुमची (पाकिस्तानची) हुशारी १९७१ मध्येच पाहिली आहे, जेव्हा तुम्ही गुडघे टेकले आणि ढाक्यामध्ये शस्त्रे खाली ठेवली. वर्ष १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने ढाक्यामध्ये भारतासमोर शरणागती पत्करली आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. ९० सहस्र पाकिस्तानी सैनिकांनी ढाक्यामध्ये कशा प्रकारे अपमानजनक स्थितीत शरणागती पत्करली ?, हे सर्वांना ठाऊक आहे. पाकिस्तानने हे त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिकवले पाहिजे. त्यांनी मुलांना सांगितले पाहिजे की, ढाक्यामध्ये आपल्या सैनिकांची केवळ शस्त्रेच मागे राहिली नाहीत, तर त्यांच्या विजारीही (पँटही) तेथेच लटकत होत्या.’’
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !