शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा केवळ कनिष्ठ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद झाल्यावरून आरोप

संभल (उत्तरप्रदेश) – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘यामध्ये केवळ कनिष्ठ कर्मचार्यांची नावे घेण्यात आली आहेत, तर चोरीला उत्तरदायी असणार्या मोठ्या लोकांना सोडून देण्यात आले’ आहे, असा आरोप केला. त्यांची चालू असलेली ‘गो धर्म यात्रा’ संभल येथे पोचल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
न्यासापासून शंकराचार्य, धर्माचार्य, संत, महंत, पुजारी यांना दूर ठेवले गेले !
शंकराचार्य म्हणाले की, दानाच्या चोरीविषयी काय म्हणावे ? श्रीराममंदिराच्या संदर्भात प्रारंभापासूनच मनमानी निर्णय घेतले गेले आहेत. यात ना शास्त्रांचे पालन झाले, ना वेदांचे, ना धर्मगुरूंच्या सल्ल्याचा विचार केला गेला. राजकीय नेत्यांनी निवडलेल्या लोकांचा समावेश करून न्यासाची स्थापना करण्यात आली, तसेच संत, महंत आणि पुजारी यांना यापासून दूर ठेवले गेले. जर सर्व काही प्रामाणिकपणे करायचे असते, तर हा न्यास ४ शंकराचार्य, रामानंदाचार्य आणि इतर धर्मगुरु यांच्या स्वाधीन केला जाऊ शकला असता. त्याऐवजी विश्वासातील राजकीय सहकार्यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यावरून प्रारंभापासूनचा हेतू स्पष्ट होतो,’ असे त्यांनी पुढे जोडले.
मोठ्या चोर्या मोठ्या लोकांकडून केल्या जातात !
दानाच्या चोरीच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याचा उल्लेख करत शंकराचार्य म्हणाले की, आम्ही ऐकले आहे की, ज्यांनी नोटा मोजल्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी तर केवळ दान पेटीतील काढलेल्या नोटा सरळ केल्या, त्या मोजल्या आणि त्यांच्या थप्प्या लावल्या. आम्हाला त्या मोठ्या चोरीविषयी सांगा, जी त्यानंतर झाली. मोठ्या प्रमाणावर चोर्या या मोठ्या लोकांकडून केल्या जातात. त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. जर या आरोपांमध्ये तथ्य होते, तर अगदी पहिल्याच दिवशी, अगदी अज्ञात व्यक्तींविरुद्ध का होईना, गुन्हा नोंदवायला हवा होता. चौकशीनंतर शेवटी गुन्हा नोंदवला गेला. ही वस्तूस्थितीच दर्शवते की, तिथे अन्वेषण करण्यासारखे काहीतरी होते. विरोधक केवळ अनियमितता समोर आणून कर्तव्य बजावत आहेत.
सनातन धर्मासाठी कटीबद्ध असणार्या उमेदवारांना जनतेने पाठिंबा द्यावा !
जर भाजपने गायीला ‘राजमाता’ घोषित केले, तर त्याला याचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो; पण तो तसे करत नाही. जर इतर कोणत्याही पक्षाला आमच्या ‘गो धर्म यात्रे’चा राजकीय लाभ घ्यायचा असेल, तर आम्ही त्यांना थांबवणार नाही. मतदारांनी त्यांचा पाठिंबा सनातन धर्मासाठी कटीबद्ध असलेल्या ‘खर्या’ उमेदवारांसाठीच राखून ठेवला पाहिजे आणि अशा दृष्टीकोनातून शेवटी एक पर्यायी राजकीय नेतृत्व निर्माण होईल.
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !