राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदने !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम 

सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाची लस घेऊन मोहिमेस सहकार्य करावे ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले आहे. कोणतीही भीती न बाळगता सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाची लस घ्यावी आणि या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

देशभरासह गोव्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ

देशभरात कोविड लसीकरणाचा १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून ‘व्हर्च्युअल’ माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर ! – राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम रहातील, अशी सूचना केली आहे. याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्या वेळी घेतले, त्या वेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे.

अयोध्येतील राममंदिरासाठीच्या निधीसमर्पण मोहिमेला पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातून प्रारंभ

अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावरील २.७ एकर भूमीत ५७ सहस्र ४०० चौरस फूट क्षेत्रामध्ये पुढील ३ वर्षांत भव्य अशा राममंदिराची उभारणी केली जात आहे. या अनुषंगाने उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्या अध्यक्षतेखाली गोवा समर्पण निधी समितीने गोव्यात निधी समर्पण मोहिमेला प्रारंभ केला आहे.

अनेक वर्षांपासून कुळाचार म्हणून प्रत्येक कार्यक्रमात श्री सरस्वती देवीची प्रतिमा वापरून स्तवन करतो ! – मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

‘श्री सरस्वती देवीची प्रतिमा ही कुठल्या धर्माचे प्रतीक नाही, तर ती विद्येची देवता आहे.

कोरोनाची लस घेतली तरी मास्क वापरणे आवश्यक – मुख्यमंत्री

कोरोनाची लस घेतली तरी संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे.

रुग्णालयातील उपकरणांच्या देखभालीकडे चेन्नई येथील आस्थापनाचे दुर्लक्ष !

उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात १० नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागलI.

राज्यात कोरोनाचे संकट ओसरत असले, तरी चिंता कायम !

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके आहे.

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान !

राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ सहस्र २३४ निवडणुकींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत किरकोळ अपप्रकार वगळता चुरशीने मतदान झाले.