असोदा (जिल्हा जळगाव) येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा उमेदवारांवर सौम्य लाठीमार

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला.

२५ जानेवारीपासून गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन

२५ ते २९ जानेवारी या कालावधीत गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन होणार आहे. २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन असल्याने या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार नाही.

प्रशासनाकडून योग्य मोबदला न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणारे अरुणा प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांचे उपचारांच्या वेळी निधन

मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – तानाजी कांबळे

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ७ केंद्रांमध्ये ७०० आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार

‘‘२ खासगी आणि ५ सरकारी रुग्णालये मिळून एकूण ७ केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

१ फेब्रुवारीपासून वीजदेयक थकबाकीदारांची वीजजोडणी तोडणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

थकबाकीदारांमधील अल्प थकबाकीदारांनी वीज खात्याच्या ‘वन टाईम् सेटलमेंट’ योजनेचा लाभ घेतला आहे. नोटिसीचा कालावधी संपल्यानंतर सर्व थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्यात येणार आहे, अशी चेतावणी वीजमंत्र्यांनी दिली आहे.

वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले

वर्षा राऊत यांनI आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे

भुयारी रस्त्याचे होणार आता शासकीय उद्घाटन !

अनुमाने ७५ कोटी रुपये व्यय करून भुयारी रस्ता बांधण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ! – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांचा आरोप

शहरातील अनेक विकासकामे, गटारे, प्रवेशद्वार बांधणी यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ३१० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण !

महापालिकेच्या पहाणीत अग्नीसुरक्षा यंत्रणा आढळून आली नाही तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येईल,

राज्यातील ३५८ केंद्रांच्या माध्यमातून ३५ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येणार ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे.