निद्रानाशाचा रोग झाला, तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. नाम उपाधीरहित असल्याने आपणही उपाधीरहित झाल्याविना नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते, त्याच्याच मुखात नाम येते. साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे. त्याचे कल्याण झाल्याखेरीज रहाणार नाही.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज