काही बुद्धीमान असे म्हणतात, ‘ईश्वर ही मानवाची निर्मिती आहे.’ हे चुकीचे आहे. ईश्वर हा मानवाचा शोध आहे. माणसाने ईश्वर निर्माण केला नाही. ईश्वराचे अस्तित्व माणसाने शोधून काढले. कोलंबस याने अमेरिका खंड निर्माण केला नाही, तर शोधून काढला. ‘ईश्वर आपल्याला भेटावा, त्याचे दर्शन व्हावे, कृपा व्हावी’, हे त्या मनुष्याची योग्यता आणि त्याची पातळी जशी असेल, त्यावर अवलंबून असते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’)