नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंत:करणाने आपण नाम घेतले, म्हणजे आपले काम शीघ्र होते. भगवत्प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे, म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे. आपल्या पैशावर स्वतःची सत्ता नाही, आपल्या माणसांवर स्वतःची सत्ता नाही. म्हणून स्वतःचे कर्तव्य तेवढे करावे आणि ते करत असतांना स्वतःचे मन दुश्चित्त होऊ देऊ नये. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे, म्हणजे मनात शंका येत नाहीत.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(साभार : ‘पू. प्रा. के.वि. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांचे फेसबुक)