परमेश्वराने मागच्या जन्माचे स्मरण मनुष्याला ठेवले नाही, यात त्याचे औदार्यच प्रगट होते. त्याची कृपाच स्पष्ट होते. एका जन्मातील आठवणी आणि त्याचे रागद्वेष सांभाळता सांभाळता माणसाचा जीव हैराण होतो, तर जन्मजन्मांतरीच्या आठवणी अन् त्या संदर्भातील रागद्वेषाचा बोजा सांभाळणे किती कठीण होईल !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘हिंदु धर्म समजून घ्या !’)