भावसत्संगाचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
‘वर्ष २०१६ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या साधकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संगाचा आरंभ झाला. आठवड्यातून एकदा (प्रत्येक गुरुवारी) असणार्या या भावसत्संगात आध्यात्मिक कथा आणि त्यांचा भावार्थ सांगितला जातो. हा भावसत्संग सनातनच्या भाव असलेल्या साधिका घेतात. भावसत्संगात भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करावेत? साधना वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ? यांसंदर्भात मार्गदर्शनही केले जाते. या भावसत्संगामुळे अनेक साधकांना साधनेत साहाय्य झाले आहे. ‘भावसत्संग घेणे किंवा तो ऐकणे यांचा साधकांतील सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतात ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात.
१. चाचणीतील नोंदींचे विवेचन
या प्रयोगात भावसत्संग घेणार्या २ साधिका आणि भावसत्संग ऐकणारे ४ साधक-साधिका सहभागी झाले होते. भावसत्संगापूर्वी आणि भावसत्संगानंतर सर्वांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या नोंदी पुढे दिल्या आहेत.
वरील नोंदीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
अ. भावसत्संग ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधिकांमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नाहीशी झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली.
आ. भावसत्संग ऐकल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसणार्या साधकांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली.
इ. भावसत्संग घेणार्या साधिकांतील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
निष्कर्ष : ‘भावसत्संग ऐकल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होतात’, हे यातून स्पष्ट झाले.
२. चाचणीतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. भावसत्संग ऐकण्याचा चाचणीतील सर्वांवर (त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) सकारात्मक परिणाम होण्याचे कारण : भावसत्संगातील विषय साधनेसाठी प्रोत्साहन देणारे असतात. भावसत्संगामध्ये सांगितल्या जाणार्या आध्यात्मिक कथांतून श्रोत्यांची अंतर्मुखता वाढते आणि त्यांच्या मनात ईश्वराप्रती भक्तीभाव निर्माण होतो. या भावसत्संगातून भाव, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित झाली. त्यामुळे चाचणीतील सर्वांभोवती सात्त्विक स्पंदनांचे वलय निर्माण झाले. भावसत्संग ऐकण्यापूर्वी ज्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा होती ती नाहीशी झाली आणि सर्वांमधील सकारात्मक ऊर्जा वाढली.
२ आ. भावसत्संग घेणार्या साधिकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात वाढण्यामागील कारण : भावसत्संग घेण्यार्या साधिकांमध्ये मूलतः ईश्वराप्रती भाव आहे. राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संग घेणे, ही समष्टी सेवा दोघींनी भावपूर्ण केल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात वाढली.
थोडक्यात ‘व्यक्तीने भक्तीभाव निर्माण करणारे भावसत्संग ऐकणे तिच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहेत’, हे या चाचणीतून स्पष्ट झाले.’
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.७.२०२४)
इ-मेल : [email protected]
|