पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्यांचे अंत्यदर्शन घेणार्‍यांनाआध्यात्मिक लाभ होणे

संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

‘४.६.२०२४ या दिवशी सायंकाळी सनातनचे संत पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांनी रुग्णालयात देहत्याग केला. दुसर्‍या दिवशी ‘संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे संशोधन करण्यात आले. हे संशोधन १६ जून या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले. आजच्या लेखात ५.६.२०२४ या दिवशी सकाळी सनातनचे साधक-साधिका आणि संत यांनी पू. मेनरायकाका यांच्या चैतन्यमय पार्थिवाचे सनातनच्या आश्रमात अंत्यदर्शन घेतले. या वेळी अनेकांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या, त्या येथे देत आहोत.

पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे प्रत्यक्ष अंत्यदर्शन घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती

पू. भगवंत मेनराय

अ. ‘पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाकडे बघितल्यावर ते झोपले आहेत, असे वाटत होते. त्या वेळी माझे मन शांत झाले आणि माझा नामजप चालू झाला.’ – कु. कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आ. ‘पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना माझी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘पू. मेनरायकाकांचे आता सूक्ष्मातून कार्य आरंभ झाले आहे आणि त्यांच्याकडून चैतन्य अन् भाव यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले. माझे मन निर्विचार झाले.’

– सुश्री (कु.) भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), फोंडा, गोवा.


पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती

१. ‘पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेतांना माझ्यावरील त्रासदायक (काळे) आवरण न्यून झाले. मला थोडी ग्लानी आली; पण नंतर शांत वाटले.’

– श्री. धनंजय कर्वे, फोंडा, गोवा.

२. ‘पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेतांना मला पुष्कळ शांत आणि स्थिर वाटले.’

– श्री. आर्य राणे, फोंडा, गोवा.

३. ‘पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेतांना त्यांनी पूर्वी सांगितलेले नामजपाचे महत्त्व त्यांच्याच शब्दांत मला (सूक्ष्मातून) ऐकू आले. तेव्हा माझ्या मनाला शांतता जाणवली. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म किती महत्त्वाचे आहे’, असा विचार मनात येऊन मी मानसरित्या त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. तेव्हा माझ्या मनातील विचार न्यून होऊन माझे मन शांत झाले.’

– सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा.

४. ‘पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेतांना ‘पू. मेनरायकाकांचे पार्थिव दर्शनासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील भोजनकक्षाच्या बाहेरील मोकळ्या जागेत ठेवले आहे. त्यांच्या पार्थिवाच्या सर्व बाजूंनी तेजस्वी पिवळा प्रकाश पसरला आहे. पू. मेनरायकाकांचे अंत्यदर्शन घेतांना साधकांना त्यांच्याकडून पुष्कळ चैतन्य मिळत आहे. पू. काकांचा चैतन्यमय सूक्ष्मदेह जनलोकात पोचला असून ते सर्वांकडे प्रेमाने बघत आहेत’, असे मला जाणवले.’

– सौ. मधुरा कर्वे, फोंडा, गोवा.

५. ‘पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेण्यासाठी प्रार्थना करतांना ‘पू. मेनरायकाकांचे पार्थिव सनातनच्या

सौ. मानसी राजंदेकर

आश्रमातील भोजनकक्षाच्या बाहेरील मोकळ्या जागेत ठेवले आहे’, असे मला जाणवले. तेथे मानसरित्या पू. मेनरायकाकांचे दर्शन घेत असतांना माझ्या मनाला शांत वाटत होते. त्यांच्याभोवती पांढरा प्रकाश आणि त्याच्या आत चैतन्याचा पिवळा प्रकाश दिसत होता. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यावर निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात जाणवत होते. त्यावेळी माझ्या सहस्रारचक्रावर चांगल्या संवेदना जाणवल्या.’

६. ‘सनातनचे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना पू. मेनरायकाका यांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेण्याच्या संदर्भातील सूत्र सांगितल्यावर पू. वामन यांनी प्रार्थना केली आणि ते काही वेळ डोळे मिटून बसले. त्यानंतर पू. वामन म्हणाले, ‘‘पू. मेनराय आजोबांमध्ये निर्गुण तत्त्व जाणवले आणि त्यांना बघून शांत वाटले.’’

– सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा.


पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाचे साधक-साधिका आणि बालसंत यांनी ‘मानसदर्शन’ घेतल्यावर त्यांच्यावर झालेले सकारात्मक परिणाम

‘मानसदर्शन घेणे’, म्हणजे व्यक्तीने प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्थुलातून न जाता, ती जेथे आहे तेथून, उदा. तिच्या निवासस्थानी थांबून प्रार्थना करून ‘संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहे’, असा मनात भाव ठेवून दर्शन घेणे. चाचणीतील साधक-साधिका आणि बालसंत यांनी त्यांच्या घरून, तर आश्रमात निवासाला असणार्‍या साधिकेने तिच्या खोलीतून संतांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेतले. संतांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर सर्वांची छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्या करण्यात आल्या. या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील नोंदींतून लक्षात येते की, पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाचे मानसदर्शन घेणार्‍या सर्वांनाच त्यांच्यातील भावानुसार आध्यात्मिक लाभ झाले. एकूणच या संशोधनातून ‘कोणतीही कृती करतांना ती भावासहित करणे किती महत्त्वाचे आहे’, हेही लक्षात येते.

येथे हेही शिकायला मिळते की, एखादा साधनेत प्रगती केलेल्या एखाद्या उन्नताच्या अंत्यदर्शनाला जाऊ शकत नसला, तरी आहे तेथून त्याने मनाने दर्शन घेतले, तर त्याचाही त्याला लाभ होतो.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला पू. मेनरायकाकांचे अंत्यदर्शन घेण्याची आणि त्यांचे चैतन्य अनुभवण्याची संधी मिळाली, यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के),  फोंडा, गोवा. (सर्व सूत्रांचा दिनांक ५.६.२०२४)

टीप – बालसंतांच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २३०० मीटरपेक्षा अधिक आहे; पण ती अचूक मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडली. त्यामुळे ती अचूक मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.

 

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक