सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांतून (त्यांनी लिखाण केलेल्या कागदांतून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

संतांच्या हस्ताक्षराचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे औषधांच्या खोक्यांच्या पांढर्‍या (कोर्‍या) बाजूचा उपयोग लिखाणासाठी करतात. त्यांच्या हस्तलिखितांमध्ये (त्यांनी लिखाण केलेल्या कागदांमध्ये) पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे त्या कागदांतील सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांच्या (त्यांनी लिखाण केलेल्या कागदांच्या) संदर्भात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ हे उपकरण आणि लोलक यांचा उपयोग करून आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. लोलकानेही वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या चाचणीसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मे ते जुलै २०२३ या कालावधीतील २ प्रकारच्या (औषधाच्या खोक्यांच्या) कोर्‍या कागदांवर केलेले लिखाण निवडण्यात आले. तुलनेसाठी म्हणून तशाच प्रकारच्या (औषधाच्या खोक्यांच्या) कोर्‍या कागदांच्याही चाचण्या करण्यात आल्या. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजतांना ती २,३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती पूर्ण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे हस्तलिखितांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अचूक मोजण्यासाठी ती लोलकाने मोजण्यात आली. या चाचण्यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

महर्षी

१. पहिल्या औषधाच्या खोक्यांच्या कोर्‍या कागदांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा असणे; पण तशाच कागदांवरील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण असलेल्या कागदांमध्ये मात्र नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

टीप १ : या रकान्यातील ज्ञान सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून प्राप्त झाले आहे.

२. दुसर्‍या औषधाच्या खोक्यांच्या कोर्‍या कागदांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा असणे; पण तशाच कागदांवरील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण असलेल्या कागदांमध्ये मात्र नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

सौ. मधुरा कर्वे

टीप २ : या रकान्यातील ज्ञान सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून प्राप्त झाले आहे.

निष्कर्ष : व्यक्तीच्या हस्ताक्षरातील स्पंदनांचा परिणाम तिने लिखाण केलेल्या कागदांवर होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याने त्यांच्या हस्ताक्षरातही पुष्कळ चैतन्य आहे. याचा सकारात्मक परिणाम त्यांनी लिखाण केलेल्या कागदांवर झाल्याने ते कागद चैतन्याने भारित झाले, हे या चाचण्यांतून दिसून आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.८.२०२३)

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये समष्टीचे कल्याण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, या कार्यांची पूर्तता करण्यासाठी विविध देवतांची तत्त्वे कार्यरत होऊन त्यांच्या देहातून संबंधित देवतेचे चैतन्य अन् ईश्वराची सकारात्मक ऊर्जा यांची वलये वायुमंडलात प्रक्षेपित होणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

‘जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्थुलातून कोणतीही कृती करत नसतात, तेव्हा ते शिवात्मादशेत राहून निर्गुण ईश्वराशी एकरूप होऊन शांतीची अवस्था अनुभवत असतात. जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्थुलातून कोणतीही कृती, उदा. लिखाण करत असतात, तेव्हा ते शिव-शिवात्मा दशेत असतात. तेव्हा ते निर्गुण-सगुण किंवा सगुण-निर्गुण या स्तरांवर येऊन कार्य करत असतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असले, तरी अवतारी कार्याची पूर्तता करण्यासाठी त्यांच्यामध्ये समष्टीचे कल्याण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे यांसाठी आवश्यक असणार्‍या देवतेचे तत्त्व कार्यरत होते. त्या वेळेस त्यांच्या देहातून संबंधित देवतेचे चैतन्य आणि ईश्वराची सकारात्मक ऊर्जा यांची वलये वायुमंडलात प्रक्षेपित होतात.

अ. जेव्हा त्यांच्यामध्ये ईश्वराची इच्छाशक्ती कार्यरत होते, तेव्हा त्यांच्याकडून ब्रह्मदेवाचे चैतन्य आणि श्री सरस्वतीदेवीची कल्पनाशक्ती यांची संयुक्त वलये वायुमंडलात प्रक्षेपित होतात.

आ. जेव्हा त्यांच्यामध्ये क्रियाशक्ती कार्यरत होते, तेव्हा त्यांच्याकडून श्रीविष्णूचे चैतन्य आणि श्री महालक्ष्मीदेवीची धारणाशक्ती यांची संयुक्त वलये वायुमंडलात प्रक्षेपित हाेतात.

इ. जेव्हा त्यांच्यामध्ये ईश्वराची ज्ञानशक्ती कार्यरत होते, तेव्हा त्यांच्याकडून शिवाचे चैतन्य आणि श्री दुर्गादेवीची लयकारीशक्ती यांची संयुक्त वलये वायुमंडलात प्रक्षेपित होतात.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये कार्यरत झालेल्या शक्तीच्या प्रकारानुसार त्यांच्याकडून प्रक्षेपित झालेले देवतांचे तत्त्व, चैतन्याचा स्तर आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण !

५. कृतज्ञता

यावरून आपल्या लक्षात येते, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये समष्टीच्या कल्याणासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यकतेनुसार ब्रह्मा, विष्णु आणि महेश या देवतांचे तत्त्व कार्यरत होते. त्यामुळे ते त्रिदेवस्वरूप दत्तगुरुच आहेत.’ अशा दत्तस्वरूप मोक्षगुरूंच्या चरणी कोटी कोटी वंदन !’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.