‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

संतांच्या छायाचित्रमय जीवनचरित्रविषयक ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे छायाचित्रमय जीवनदर्शन भाग १ ते ६ हे सर्व ग्रंथ अप्रतिम आहेत. हे ग्रंथ हातात धरून किंवा त्याकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवते. हे ग्रंथ वाचतांना साधक भावविभोर होतात आणि भावविश्वात रममाण होतात. या ग्रंथांतील छायाचित्रे आणि लिखाण यांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे.

सनातनचा ग्रंथ ‘छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ६ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव आणि अन्य सोहळे’ याचे मुखपृष्ठ

‘सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे संशोधन करण्यात आले. ‘यू.ए.एस्.’ उपकरण आणि लोलक यांचा उपयोग करून वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

या चाचणीत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ भाग १ ते ६ या ग्रंथांच्या आणि तुलनेसाठी म्हणून समाजातील एका छायाचित्रमय ग्रंथाच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या नोंदी पुढे दिल्या आहेत.

टीप – छायाचित्रमय जीवनदर्शन भाग १ ते ६ या ग्रंथांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २३३७ मीटरपेक्षा अधिक आहे; पण ती अचूक मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडली. त्यामुळे ती अचूक मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.

टीप १ – ‘ऑरा स्कॅनर’ने १४० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात येतात –

अ. तुलनेसाठी घेतलेल्या समाजातील एका संतांच्या ग्रंथात अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ भाग १ ते ६ या ग्रंथांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. या ग्रंथांच्या मुखपृष्ठांपेक्षा त्यांच्या मलपृष्ठांतील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अधिक आहे आणि ग्रंथांच्या आतील पृष्ठांतील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण त्याहूनही अधिक आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, ग्रंथांच्या मुखपृष्ठांतून सगुण, मलपृष्ठांतून सगुण-निर्गुण आणि ग्रंथांच्या आतील पृष्ठांतून निर्गुण-सगुण स्तरांवरील स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. सगुण, सगुण-निर्गुण आणि निर्गुण-सगुण स्तरांवरील स्पंदने अधिकाधिक सूक्ष्म असल्याने अधिकाधिक प्रभावी आहेत.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन या ग्रंथांत पुष्कळ प्रमाणात चैतन्य असण्याचे कारण

सौ. मधुरा कर्वे

एखाद्या ग्रंथातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असतात, उदा. ग्रंथ लिखाणाचा उद्देश, ग्रंथाचा विषय आणि त्याची मांडणी, ग्रंथाची भाषा अन् लिपी, लिखाणाचे व्याकरण आणि संकलन, लेखकाची आध्यात्मिक पातळी अन् त्याला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, ग्रंथ-निर्मितीच्या संदर्भात विविध टप्प्यांवर केल्या जाणार्‍या कृती, उदा. मुद्रितशोधन, संरचना, मुखपृष्ठ अन् मलपृष्ठ यांची संकल्पना आणि त्यांवरील चित्रे अन् लिखाण इत्यादी. थोडक्यात हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील तेवढे त्या ग्रंथातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. चाचण्यांतील नोंदींतून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांत किती मोठ्या प्रमाणावर चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) कार्यरत आहे, हे लक्षात येते. या चैतन्यमय ग्रंथांचे वाचन करतांना साधक आणि वाचक यांचे मन अन् बुद्धी यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतात, तसेच त्यांना त्यांच्या भावानुसार ग्रंथांच्या संदर्भात आध्यात्मिक अनुभूतीही येतात. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ हे साधकांसाठी, तसेच पुढील अनेक पिढ्यांसाठी चैतन्याचा अखंड स्रोत आहे.’  (४.६.२०२४)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

इ-मेल : [email protected]

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक