‘पू. अश्विनीताईंशी माझा बर्याच वेळा सेवेच्या संदर्भात संपर्क येत असतो. काही दिवस आमचा सेवेच्या निमित्ताने संपर्क झाला नाही. एक दिवस पू. ताईंचा मला ‘दादा कसा आहेस ? तुझी आठवण आली’, असा लघुसंदेश आला. पू. ताईंचा तो लघुसंदेश वाचून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझ्या मनात आले, ‘पू. ताई सेवेत पुष्कळ व्यस्त असूनही त्यांनी मला लघुसंदेश करून माझी विचारपूस केली. त्यांची साधकांवर किती प्रीती आहे ना ! संतांनी आठवण काढणे, म्हणजे त्यांची कृपा आणि चैतन्य यांचे कवच आपल्याभोवती निर्माण होणे आहे. या कवचामुळेच आपत्काळात आपले रक्षण होणार आहे.’
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. अश्विनीताईंसारखे घडवलेले सनातनचे संत हेच साधकांचे खरे आई-वडील आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.६.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |