‘देवद आश्रमातील चैतन्‍यामुळे सर्व प्राणीमात्रांना तेथे यावे’, असे वाटणे आणि त्‍यांना ‘हे आपल्‍या उद्धाराचे क्षेत्र आहे’, अशी जाणीव असणे

पू. (सौ.) अश्विनी पवार

१. ‘संतांच्‍या वास्‍तव्‍यामुळे देवद आश्रमातील चैतन्‍यात वृद्धी होत आहे’, हे लक्षात येणे

‘परात्‍पर गुरु पांडे महाराज यांचे देवद आश्रमात १२ वर्षे वास्‍तव्‍य होते. देवद आश्रमात अनेक संत आहेत. आश्रमात ६० टक्‍के आणि त्‍याहून अधिक आध्‍यात्मिक पातळी असलेले साधक साधनारत आहेत. आश्रमातील अन्‍य साधकांचेही साधनेचे प्रयत्न वाढून त्‍यांची साधना वाढत आहे. या सर्वांमुळे आश्रमातील चैतन्‍यात वृद्धी होत असल्‍याचे लक्षात येते.

२. अनेक वेळा आश्रमाच्‍या इमारतीच्‍या सज्‍जांवर काही पारवे डोळे मिटून बसल्‍याचे आढळतात. ‘ते आश्रमाच्‍या चैतन्‍यमय वातावरणात ध्‍यान लावून बसले आहेत’, असे जाणवते. ते बराच वेळ डोळे मिटून बसतात.

३. साधक सेवा करतांना किंवा आश्रम परिसरात फेर्‍या मारत असतांना खारी त्‍यांच्‍या जवळून निर्भयतेने जात असणे

आश्रम परिसरात असलेल्‍या वृक्षांवर खारी फिरतांना आढळतात. काही वेळा खारी वृक्षांवरून आश्रमाच्‍या इमारतीत प्रवेश करून मार्गिकेत फिरतांना आढळतात. काही वेळा आश्रम परिसरात साधक फेर्‍या मारत असतांना किंवा सेवा करत असतांना खारी त्‍यांच्‍या आजूबाजूने निर्भयतेने जातांना आढळतात. खारीसारखा प्राणी मानवी वस्‍तीत सहजासहजी येत नाही; पण ‘या खारी आश्रमातील चैतन्‍यामुळे आश्रमात सुरक्षित वातावरण अनुभवतात’, असे जाणवते.

४. आश्रमाच्‍या जवळ असलेल्‍या नदीकिनार्‍याच्‍या भागात काही वेळा मुंगूस आढळतात. ते इकडून तिकडून पळतांना दिसतात.

५. आश्रमात फुलपाखरे आनंदाने बागडत असणे

आश्रम परिसरात असलेली फुलझाडे आणि वेली यांवरून फुलपाखरे आनंदाने बागडतांना दिसतात. ही फुलपाखरे काही वेळा आश्रमाच्‍या इमारतीच्‍या आतही येतात. काही वेळा आश्रमाच्‍या इमारतीच्‍या भिंती, खांब, खिडक्‍या इत्‍यादी ठिकाणी फुलपाखरे बागडत असल्‍याचे दिसून येते.

६. ‘सत्‍संगामुळे क्षुद्र योनीतील जिवाला मुक्‍ती मिळून तो त्‍याच्‍या पुढील उच्‍च योनीत जन्‍म घेतो’, हे लक्षात येणे

देवद आश्रमाच्‍या परिसरात कावळा, चिमणी, पारवे, मुंगूस, खारी, फुलपाखरे, घोरपड, तसेच विविध सरपटणारे प्राणी आढळतात. काही वेळा मला हे पक्षी आणि प्राणी आश्रम परिसरात मृत झालेले आढळले. मी साधनेला आरंभ केला, तेव्‍हा सत्‍संगात ‘सत्‍संगाचे फळ काय आहे ?’, अशा आशयाचे सूत्र सांगितले जायचे, त्‍याचे या वेळी मला स्‍मरण झाले. ‘सत्‍संगामुळे क्षुद्र योनीतील जिवाला मुक्‍ती मिळून तो त्‍याच्‍या पुढील उच्‍च योनीत जन्‍म घेतो’, हे लक्षात आले.

७. गुरूंचा आश्रम हा सर्व प्राणीमात्रांसाठी ‘वैकुंठधाम’ म्‍हणजे ‘मोक्षधाम’ आहे’, याची अनुभूती आमच्‍यासारख्‍या मानवांप्रमाणे अन्‍य योनीतील जीवही घेत आहेत. ‘त्‍यांनाही गुरूंचा आश्रम हवाहवासा वाटतो आणि हे आपल्‍या उद्धाराचे क्षेत्र आहे’, अशी जाणीव त्‍यांनाही असल्‍याचे जाणवते.’

– (पू.) सौ. अश्‍विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक