संतांप्रती भाव असणारी देवद (पनवेल) येथील आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची चि. श्रीनिधी हरीश पिंपळे (वय ५ वर्षे)!

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! चि. श्रीनिधी हरीश पिंपळे ही या पिढीतील एक आहे !

माघ शुक्‍ल त्रयोदशी (३.२.२०२३) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील चि. श्रीनिधी हरीश पिंपळे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त सनातनच्‍या ६९ व्‍या संत पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांनी टिपलेला तिच्‍यातील संतांविषयीच्‍या भावाविषयीचा प्रसंग पुढे दिला आहे.

पू. (सौ.) अश्विनी पवार
चि. श्रीनिधी पिंपळे

चि. श्रीनिधी पिंपळे हिच्‍या ५ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘डिसेंबर २०२२ मध्‍ये एकदा मी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करत होते. आम्‍ही ज्‍या पटलावर महाप्रसाद घेण्‍यासाठी बसलो होतो, तिथे आश्रमातील काही साधिका आणि सौ. मनीषा हरीश पिंपळे (वय २८ वर्षे) याही बसल्‍या होत्‍या. तिथून थोड्याच अंतरावर सौ. मनीषा पिंपळे यांची ५ वर्षांची मुलगी चि. श्रीनिधी एका खेळण्‍यासह खेळत होती. त्‍या खेळण्‍याला असलेली किल्ली फिरवल्‍यावर ते चालू होत होते.

ती खेळत असतांना आश्रमातील पू. उमेशअण्‍णा (सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै, वय ७३ वर्षे) तिच्‍या जवळ गेले. त्‍यांनी तिच्‍या खेळण्‍याला असलेली किल्ली फिरवली. त्‍यामुळे ते खेळणे गतीने चालू लागले. ते पाहून तिला पुष्‍कळ आनंद झाला. ती आनंदाने उड्या मारत मारत तिच्‍या आईकडे आली. त्‍या वेळी ‘किल्ली फिरवल्‍यावर खेळणे गतीने चालू झाले; म्‍हणून तिला आनंद झाला असावा’, असे आम्‍हाला वाटले; परंतु ती तिच्‍या आईला सांगू लागली, ‘‘आई, या खेळण्‍याला संतांनी हात लावला आहे. त्‍यामुळे याच्‍यात आता चैतन्‍य आले आहे.’’

५ वर्षांच्‍या श्रीनिधीच्‍या बोलण्‍यातील संताप्रतीचा भाव पाहून मी थक्‍क झाले. ‘ही बालके दैवी का आहेत ?’, याची या प्रसंगातून प्रचीती आली आणि माझ्‍याकडून गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– (पू.) सौ. अश्‍विनी अतुल पवार (सनातनच्‍या ६९ व्‍या संत, वय ३३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२३)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक