देशाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्व संप्रदायांनी एकत्र येऊन राष्ट्र बलशाली करणे, ही काळाची आवश्यकता !

दोन संतांमधील भेद हा देशकाल परत्वे असतो, तसेच साम्य असल्याची सूत्रे जशी महत्त्वाची असतात, तेवढी भेदाची सूत्रे महत्त्वपूर्ण नसतात. ‘दासबोध’ वाचतांना त्यात लपलेले संतश्रेष्ठ ज्ञानदेव दिसावेत आणि ‘ज्ञानेश्वरी’ वाचतांना त्यात दडलेले समर्थ रामदासस्वामी समजावेत. देहूच्या मंदिरात समर्थांचे दर्शन घडावे, तर सज्जनगडावरील समर्थ मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घडावे.

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या रचनेचे वैशिष्ट्य

प.प. टेंब्येस्वामी महाराजांनी अनेक चतुर्मास नर्मदा तिरी केले. अत्यंत कठोर व्रताचरणी आणि सर्व यम-नियम पाळून तपाचरण करणार्‍या या प.प. टेंब्येस्वामी महाराजांच्या सर्व रचना या मंत्रयुक्त आहेत.

हिंदूंच्या देवतांचा होणारा अवमान रोखण्यासाठी अजमेर (राजस्थान) येथे हिंदूंची शांतता फेरी !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंनी संघटित होऊन काढलेली फेरी अभिनंदनीय असली, तरी अशा फेरी काढून हिंदूंच्या देवतांचा अवमान थांबण्याची शक्यता नसल्याने भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणेच आवश्यक आहे !

सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांच्या नावाचा देवाने सुचवलेला अर्थ

ज्येष्ठ शुक्ल नवमी (९.६.२०२२) या दिवशी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांचा ४६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवाने त्यांच्या नावाचा साधकांना सुचवलेला अर्थ पुढे दिला आहे. या लिखाणातील प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षरावरून ‘पू. रमानंद गौडा’, हे नाव सिद्ध होते.

संतांनी सांगितलेला सेवाधर्म अंगीकारण्याची सध्याच्या काळात आवश्यकता ! – डॉ. सदानंद मोरे

‘ज्ञानोबा तुकाराम’ या वार्षिक अंकाच्या वतीने वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात dnyanbatukaram.com या ‘वेबपोर्टल’चे लोकार्पणही करण्यात आले.

वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होणारी भक्तीची गंगा !

श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज, तसेच अन्य अनेक पालख्या निघतात. या सर्व पालख्यांमधील श्रेष्ठतेचा सन्मान असलेला, महाराष्ट्र, भारत आणि जगात एकमेव असलेला माऊलींचा पालखी सोहळा, म्हणजे एक सांस्कृतिक आश्चर्य आहे !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धर्मकार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी कृतीशील व्हा ! – प.पू. उल्हासगिरी महाराज, मठाधिपती, प.पू. गगनगिरी महाराज आश्रम, कोंडीवळे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु देवतांचे विडंबन, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मंदिरांवरील आक्रमणे, हिंदूंच्या उत्सवांवर होणारी दगडफेक, दंगली, ग्रंथांची अवहेलना, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण अशी असंख्य आव्हाने पहाता हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता लक्षात येते.