हिंदूंच्या देवतांचा होणारा अवमान रोखण्यासाठी अजमेर (राजस्थान) येथे हिंदूंची शांतता फेरी !

अजमेर (राजस्थान) – हिंदूंच्या देवतांच्या विरोधात केल्या जाणार्‍या विधानांचा निषेध करण्यासाठी येथे हिंदूंनी शांतता फेरी काढली. या फेरीत महिला संतांचाही सहभाग होता. यासह भाजपच्या स्थानिक आमदार अनिता भदेल याही सहभागी झाल्या होत्या. या वेळी नूपुर शर्मा यांचे समर्थन करण्यात आले. फेरीच्या सुरक्षेसाठी २० पोलीस अधिकारी आणि १ सहस्र पोलीस शिपाई तैनात करण्यात आले होते. फेरी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नेण्यात आली. येथे शेवटी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे राष्ट्रपतींना देण्यासाठीचे निवेदन सादर करण्यात आले.

१. महिला संतांनी सांगितले की, आमच्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या शिकार होत आहेत. त्यांना धमकी देऊन मारले जात आहे, त्यांच्यावर आम्ल फेकले जात आहे. याचाच निषेध करण्यासाठी आम्ही फेरी काढली आहे.

२. भाजपच्या आमदार अनिता भदेल यांनी सांगितले की, हिंदु समाज नेहमीच सद्भावाने रहातो. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंनी संघटित होऊन काढलेली फेरी अभिनंदनीय असली, तरी अशा फेरी काढून हिंदूंच्या देवतांचा अवमान थांबण्याची शक्यता नसल्याने भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणेच आवश्यक आहे !