आज ३० जून २०२२ या दिवशी प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांची पुण्यतिथी
प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या रचनेत वैशिष्ट्य आढळून येते. त्यांची बहुतेक सर्व स्तोत्रे ही मंत्रगर्भ आहेत. आजही ती नियम पाळून म्हटली, तर उत्तम फळे देतात, संकटनिवारण करतात, असा कित्येकांचा अनुभव आहे.
त्यांचे ‘सप्तशती गुरुचरित्र’ पाहिले आणि प्रत्येक चरणातील तिसरे अक्षर उभे वाचत गेले, तर भगवद्गीतेचा १५ वा अध्याय सिद्ध होतो. अशा रचना सहज सोप्या नसतात. प.प. टेंब्येस्वामी महाराजांनी अनेक चतुर्मास नर्मदा तिरी केले. अत्यंत कठोर व्रताचरणी आणि सर्व यम-नियम पाळून तपाचरण करणार्या या प.प. टेंब्येस्वामी महाराजांच्या सर्व रचना या मंत्रयुक्त आहेत.
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली (२९.६.२०२२)