साधकांना क्षणोक्षणी घडवतांना त्यांच्यावर साधनेतील एक एक गुण मिळवण्याचा संस्कार करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतात. ते त्यांच्या लहान लहान कृतींतून साधकांना प्रेरणा देतात आणि घडवतातही. ९.९.२०२४ या दिवशी त्यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यमूर्ती सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘भाद्रपद शुक्ल षष्ठी (९.९.२०२४) या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या खोलीत तिला जाणवलेले पालट आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी म्हटलेली प्रार्थना ऐकतांना तिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या निवासाच्या खोलीत गेल्यावर साधिकांना आलेल्या विविध अनुभूती !

संतांच्या अस्तित्वामुळे पावन झालेली अनेक ठिकाणे भारतात आहेत. तेथे गेल्यावर लोकांना विविध अनुभूती येतात. सांप्रत काळीही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून संत झालेल्या साधकांच्या विविध वस्तू, त्यांचे निवासस्थान इत्यादींच्या संदर्भातही अनेक साधकांना अशाच प्रचीती येत आहेत…

द्रव्य घेऊन कथा आणि प्रवचन करणे – आध्यात्मिक क्षेत्रातील अपप्रकार !

काही प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार, संत, गुरु, ज्यांच्या प्रवचनांना लोकांचा पुष्कळ प्रतिसाद लाभत आहे, तसेच ज्यांना पुष्कळ प्रसिद्धी मिळत आहे, ते प्रवचन करण्यासाठी पुष्कळ पैशांची मागणी करत आहेत. ‘हे अयोग्य आहे’, असे कुणाच्या लक्षातही येत नाही. ‘याचे प्रवचनकार, कीर्तनकार, संत किंवा गुरु, तसेच समाजमन यांवर काय परिणाम होतात ?’, ते पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेत घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धतीतून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

मागील भागात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाहिल्या. या भागात या कार्यपद्धतींविषयी लिहून देतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करतांना पू. गुरुनाथ दाभोलकर यांना झालेले त्रास

एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा त्रास इतका वाढला की, त्यांना बसणे, उठणे आणि बोलणे, हे करता येत नव्हते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ४ संतांनी तातडीने सद्गुरु अनुताईंसाठी नामजप करायला आरंभ केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेत घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती आणि त्यांचा साधकांना होणारा लाभ !

मागील भागात परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा उत्सव अनेक ठिकाणी आयोजित करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू करून साधकांना साधनेसाठी सतत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायला शिकवणे’, हा भाग वाचला. आता त्याच्या पुढचा भाग पहाणार आहोत.    

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना घडवण्यासाठी सनातन संस्थेमध्ये घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती !

मागील लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी घालून दिलेल्या काही कार्यपद्धती पाहिल्या. आता या भागात अन्य काही अद्वितीय कार्यपद्धती आणि ‘प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या साधकांना घडवण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, हे दिले आहे.          

गुरुकृपा आणि नामजपादी उपाय यांद्वारे स्वतःच्या शारीरिक त्रासांवर मात करणार्‍या सनातन आश्रम, देवद (पनवेल) येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. जयश्री साळोखे (वय ४२ वर्षे) !

सौ. जयश्री साळोखे यांना झालेले त्रास, त्यावर केलेले औषधोपचार आणि नामजपादी उपाय दिले आहेत…

स्वतःमध्ये श्रद्धा आणि भाव वाढवण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सुचवलेल्या काही स्वयंसूचना !

देवाच्या कृपेने जग पुष्कळ सुंदर आहे आणि मी या सुंदरतेचा आनंद घ्यायला आलो आहे.