सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेत घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धतीतून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मागील भागात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाहिल्या. या भागात या कार्यपद्धतींविषयी लिहून देतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.

(भाग ४)

या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/823338.html

२३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुठल्या शिकवणीमुळे आध्यात्मिक प्रगती झाली’, याविषयीचे लिखाण करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली प्रत्येक साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किती करत आहे ?’, हे लक्षात आले. त्यामुळे कृतज्ञताभाव वाढण्यास साहाय्य झाले.

आ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या साधनेतील मूलभूत सिद्धांतानुसार प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक साधकाला त्याच्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे, ते साधनेचे माध्यम उपलब्ध करून दिले आहे. यावरून त्यांची साधकांवरील ‘प्रीती’ हा गुण शिकता आला.

इ. ‘साधकांची प्रगती व्हावी’, यासाठी त्यांनी निर्मिलेल्या कार्यपद्धती पाहून अचंबित व्हायला होते. त्या कार्यपद्धती एवढ्या परिपूर्ण आहेत की, ‘पुढील काळामध्ये अनेक संतांना साधक घडवण्यासाठी त्या मार्गदर्शक ठरणार आहेत.’ यातून ‘साधकांनी साधनेत पुढे जावे’, याविषयीची त्यांची तळमळ शिकता आली.

ई. कलियुगामध्ये माणसातील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे त्याला आध्यात्मिक प्रगती करणे, साधनेत सातत्य टिकवणे अवघड जाते. या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया शोधून ‘ती सर्वसामान्य साधकालाही सहजतेने करता येईल’, एवढी सोपी केली आहे. यातून ‘प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना कशी काढावी ?’, हे शिकता आले .

उ. वाईट शक्ती साधना करणार्‍यांना पुष्कळ त्रास देतात. त्या साधकांची साधना खंडित करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात. साधकांच्या साधनेतील अडथळे दूर करण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी त्रासांची तीव्रता आणि काळ यांनुसार सतत नवीन उपाययोजना शोधल्या. त्रास देणार्‍या वाईट शक्तींशी स्वतः सूक्ष्मातून लढून त्यांनी साधकांना या त्रासातून वाचवले.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

२४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभ करून घेण्यास अल्प पडणे

साक्षात् विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचा लाभ करून घेण्यात ‘मी किती अल्प पडलो ? आणि पडत आहे ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘आताही आम्ही जी काही साधना करत आहोत, त्याची गती पुष्कळ अल्प आहे, ती वाढवायला हवी’, हेही लक्षात आले.

२५. कृतघ्नपणाची जाणीव होणे

गुरुदेवा, हे लिखाण करतांना मला माझ्यातील कृतघ्नपणाची जाणीवही झाली. आपण वेळोवेळी मला पुष्कळ शिकवले; परंतु त्यातील फारच अल्प भाग मी शब्दांत उतरवू शकलो; कारण माझ्यातील शिकण्याच्या वृत्तीच्या अभावामुळे आपण वेळोवेळी शिकवलेली अनेक सूत्रे मी त्या त्या वेळी लिहून ठेवली नाहीत.

२६. क्षमायाचना

प्रत्यक्षात काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोष्टीही मला व्यवस्थित आठवत नाहीत. त्यामुळे मला मागील सर्व आठवले आणि मी लिखाण केले, असे नसून ‘हे लेख लिहितांना मला ती सूत्रे आठवून देण्यासाठी गुरुदेवा, आपल्याला बरीच शक्ती व्यय करावी लागली असणार’, यासाठी मला क्षमा करावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

२७. कृतज्ञता

हे गुरुदेवा, माझा पिंड समष्टी प्रचाराचा आहे; परंतु मागील १३ वर्षे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी प्रचाराला बाहेर जाऊ शकत नाही; परंतु आपल्याला माझ्या साधनेची अधिक काळजी असल्यामुळे आपण मला लिखाणासाठी वेळोवेळी विषय सुचवून माझ्याकडून अनेक विषयांवर लेख लिहून घेतले अन् त्या माध्यमातून मला समष्टी साधना करण्याची संधी दिली. ‘२० – २५ वर्षांपूर्वी घडलेल्या अनेक घटना आपणच माझ्या स्मृतीपटलावर आणून माझ्याकडून हे लिखाण करून घेऊन माझी समष्टी साधना करून घेत आहात’, यासाठी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

२८. प्रार्थना

‘हे भगवंता, हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आम्ही आपल्याला संपूर्णपणे शरण आलो आहोत. कलियुगातील या रज-तमात्मक वातावरणात आमच्या साधनेचा वारू अधूनमधून इकडे तिकडे भरकटतो. तो स्थिर करून, आपल्याला अपेक्षित अशी साधना आपण आम्हा सर्व साधकांकडून करून घ्यावी’, अशी आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !’

(समाप्त)

इदं न मम । (हे लिखाण माझे नाही !)

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१७.४.२०२४)