सरकारचा निर्णय आणि आश्वासन याच्याशी मी सहमत नाही ! –  नारायण राणे, केंद्रीय मंत्री

मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर…

मनोज जरांगे मनुवादी वृत्तीचे ! – माजी आमदार 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही, त्यामुळे जरांगे हे मनुवादी वृत्तीचे असल्याचे लक्षात येते, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला.

वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, घटनातज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचे ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

जिल्ह्यातील अंतरवाली येथे पोचताच मनोज जरांगे यांनी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मंत्री छगन भुजबळ यांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचाही गैरसमज दूर होईल. आरक्षण देत असतांना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाचा लाभ होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, गाफील राहिले, तर आंदोलन फसते. आपण सावध आहोत. एक घाव दोन तुकडे केल्याविना होत नाही. सरकारने कायदा केला. त्यांचे कौतुक केले; पण त्याची कार्यवाही होईपर्यंत आपण सावध रहायचे आहे.

आरक्षणाविषयीच्या अन्य प्रतिक्रिया

बसगाड्या जाळल्या, घरेदारे जाळली, पोलिसांना मारले आदी गुन्हे न्यायालयीन आदेशाखेरीज मागे घेता येत नाहीत. अन्य गुन्हे मागे घेतले जातील.

आज सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटनांची बैठक !

छगन भुजबळ यांनी २८ जानेवारीचे सर्व कार्यक्रम रहित केले असून त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे.

तुमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या, आता आरक्षण केव्हा मिळणार ? हे मुख्यमंत्र्यांना विचारा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले आहे. 

मराठा आरक्षण मोर्चाचा ए.पी.एम्.सी.तील व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांना फटका

मराठा आरक्षण मोर्चाचा वाशी येथील ए.पी.एम्.सी. बाजारामधील मुक्काम एक दिवस वाढल्याने मुंबई आणि उपनगरे यांना पुरवठा होणार्‍या भाजीपाल्यावर  परिणाम झाला.

लाखोंच्या संख्येने सरकारकडे हरकती पाठवा !

 जे अधिवक्ते आहेत, त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून अध्यादेशावर हरकती पाठवण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत.