मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य !

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ५ मासांच्या लढ्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या.

मागासवर्ग आयोगाकडून खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करतांना ब्राह्मणांचेही सर्वेक्षण !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे.

२६ जानेवारीला ओबीसीही मुंबईत येणार !

जरांगे यांनी सरकारवर दबाव आणण्यापेक्षा, सरकार काय करू शकते आणि काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे. त्यानुसार आपली भूमिका ठरवायला पाहिजे, असा सल्ला बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.

मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांनी स्वतः येऊन चर्चा करावी ! – जरांगे

मनोज जरांगे यांची २५ जानेवारीला पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोचले होते. आंदोलकांशी चर्चा करून त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू, असे जरांगे यांनी त्या वेळी सांगितले; परंतु अखेरीस ही चर्चा निष्फळ ठरली.

विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणावर तोडगा निघेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड समिती काम करत आहे. १ लाख ४० सहस्र जणांचे पथक मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करत आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण चालू !

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून २३ जानेवारी या दिवसापासून सर्वेक्षण चालू झाले;

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त !

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चाच्या मार्गावर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सत्ता येत असते जात असते, दादागिरीची भाषा करू नका ! – मनोज जरांगे

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी या दिवशी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला.

जालना येथून मुंबईच्या दिशेने आंदोलनकर्ते मनोज जरांगे रवाना !

मनोज जरांगे म्हणाले की, आता छातीवर गोळ्या लागल्या, तरी माघार नाही. समाजासाठी मी बलीदान देण्यास सिद्ध आहे. त्या संदर्भात समाजाला विचारून निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे

आमच्यातील काही लोक सरकार फोडणार ! – मनोज जरांगे

माझ्यावर (सापळा) ‘ट्रॅप’ लावला असून सरकार मोठे षड्यंत्र रचत आहे. आमच्यातील काही लोक फोडले जाणार आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.