मुंबई – मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. २९ जानेवारी या दिवशी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलीन, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.