संभाजीनगरसह मराठवाड्याला वादळी पावसाने झोडपले !

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी वादळी पाऊस झाला. लातूर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत २ घंटे गारपीट झाली.

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.

पुणे येथील बी.जे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनीवर ‘रॅगिंग’ न झाल्याचा अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा दावा

प्रारंभी ‘रॅगिंग’ प्रकरणी तक्रार आल्याचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मान्य केले होते. २ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर डॉ. काळे यांनी ‘रॅगिंग’ झाले नसल्याचे सांगितले आहे.

बोगस बियाणे खते आढळल्यास गुन्हे नोंदवा ! – जिल्हाधिकारी

बोगस बियाणे आणि खते निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हे नोंद करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठाणे शहरात भ्रमणभाषची चोरी करणारा धर्मांध अटकेत !

पहिल्याच चोरीच्या वेळी कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम होय !

भिवंडी येथे १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण !

या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे २१० गुरांची कातडी, तर वैजापूर येथे गोवंशियांचे २ टन मांस पोलिसांनी पकडले !

गोवंशियांची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ?

एकतर्फी प्रेमातून हत्या झालेल्या तरुणीचा खटला जलदगती न्यायालयात चालवा ! – राष्ट्रीय जंगम संघटना

दोन दिवसांपूर्वी हुबळी येथे उच्च शिक्षण घेणारी नेहा हिरेमठ हिची संशयित फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली.

पुण्याचा पारा ४३.५ अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या !

पुणे शहराचे सर्वाधिक तापमान एप्रिलमध्ये ४२.८ इतके आहे; मात्र १८ एप्रिलला हडपसरचे कमाल तापमान ४३.५, वडगाव शेरी ४३.१, कोरेगाव पार्क ४३ अंशांवर पोचले होते, तर शिवाजीनगरचा पारा ४१ अंशांवर होता. अन्य सर्व भागाचे तापमान ४२ अंशांवर गेले होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !

उमेदवारांच्या स्पर्धेतून नाव मागे घेतांना उमेदवारीला विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी स्वत:चे नाव मागे घेत असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.