५० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

आश्वासन देत कर्करोगावर बोगस उपचार !

ठाणे – कर्करोगावर उपचार करण्याविषयीचे आश्वासन देत ५० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ७२ वर्षीय महिला कर्करोगग्रस्त असून त्यांना एकाने हे आश्वासन दिले होते. त्याने महिलेची एका आधुनिक वैद्याशी ओळख करून दिली; मात्र त्याने महिलेकडून ५० सहस्र रुपये उकळून बोगस उपचार केले. या प्रकरणी महिलेच्या मुलाने फसवणुकीची तक्रार प्रविष्ट केली.