लसीचा साठा संपल्यामुळे पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद !

लसीचा साठा संपल्यामुळे पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद !

कोरोना प्रतिबंधक लस संपल्यामुळे २८ एप्रिल या दिवशी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे अनिश्‍चित कालावधीसाठी बंद झाली आहेत. ज्या केंद्रांमध्ये कोवॅक्सिनचा साठा आहे, त्याच केंद्रांवर लसीकरण काही प्रमाणात चालू आहे. लसीचा साठा उपलब्ध होण्याविषयी अनिश्‍चितता आहे.

इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात !

इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात !

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्.आय.डी.सी.मधील वाय अ‍ॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला.

दळणवळण बंदी काळात १२ बलुतेदारांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करा ! – भाजपचे तहसीलदार कार्यालयात निवेदन

दळणवळण बंदी काळात १२ बलुतेदारांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करा ! – भाजपचे तहसीलदार कार्यालयात निवेदन

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ बलुतेदारांमधील परंपरागत व्यावसायिकांना प्रतिकुटुंब किमान ५ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य करावे.

पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

पुणे शहरातील नाना पेठेतील समर्थ कॉम्पेक्स मधील शितळादेवी मंदिरात २४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरांनी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे अन् सीसीटीव्हीचा व्हीडीआर् असा ऐवज चोरून नेला.

आता पुण्यात कोरोना रुग्णांचे होणार ‘ऑडिट’ !

आता पुण्यात कोरोना रुग्णांचे होणार ‘ऑडिट’ !

कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. या स्थितीत अनेक रुग्णांना वेळेत बेड न मिळणे, उपचार न होणे यांमुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता रुग्णांचे ‘ऑडिट’ करण्याचा एक नवा प्रयोग महापालिकेने घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.

सोलापूर येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी ५ सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद !

सोलापूर येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी ५ सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद !

किशोर चव्हाण या ३० वर्षीय युवकाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी पायल चव्हाण यांच्या तक्रारीवरून ५ सावकारांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील रहमतनगर भागातील अवैध धंदा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्यामहानगरपालिकेच्या अधिकार्‍याला धर्मांध फेरीवाल्यांनी केली मारहाण

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील रहमतनगर भागातील अवैध धंदा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्यामहानगरपालिकेच्या अधिकार्‍याला धर्मांध फेरीवाल्यांनी केली मारहाण

ज्या ठिकाणी धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते कायदा आणि नियम धाब्यावर बसवतात, याचे हे उदाहरण आहे. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारी पुरोगामी मंडळी अशा विषयांत मात्र गप्प रहातात. सहिष्णु हिंदूंना आक्रमक ठरवायचे आणि आक्रमक धर्मांधांना अल्पसंख्यांक …..

संभाजीनगर येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला !

संभाजीनगर येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला !

येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या प्रकरणी ३ कर्मचार्‍यांना ‘हातात नोटीस पडताच उत्तर द्या’, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस २७ एप्रिल या दिवशी बजावली आहे.

मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू !

मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू !

मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर २७ एप्रिलच्या मध्यरात्री ३ वाजून ४० मिनिटांनी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

नवीन लसीकरण केंद्रांसाठी केंद्रसरकारकडे प्रस्ताव ! – उदयनराजे भोसले

नवीन लसीकरण केंद्रांसाठी केंद्रसरकारकडे प्रस्ताव ! – उदयनराजे भोसले

केंद्रशासनाच्या वतीने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना विनामूल्य लसीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्येचा विचार करता शहरातील सदरबझार, दगडी शाळा आणि शाहूपुरी ग्रामपंचायत इमारत याठिकाणी नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याविषयी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.