शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांच्या स्मरणार्थ कोकणवासियांकरता राज्य शासनाद्वारे २० ऑक्टोबर १९७६ या दिवशी चालू करण्यात आलेल्या या जुन्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे आधुनिकीकरण करण्यात आले.

‘ॲक्टिव्ह ग्रुप’ चिपळूण आयोजित चर्चासत्रात तालुका पर्यटन चळवळीस उभारी देण्याचा निर्धार !

आगामी काळात शहराला उपलब्ध होणारे रस्ते आणि अन्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर हेरीटेज अन् सह्याद्रीतील आजूबाजूच्या भटकंतीसाठी ‘चिपळूण’ प्रसिद्ध आणि विकसित करायला हवे.

मंदिरांच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या ५ वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपये संमत !

पर्यटनाला चालना मिळण्याचा मानस ! केवळ पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाला आध्यात्मिक लाभ होईल, या दृष्टीने मंदिरांचा विकास व्हायला हवा !

दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून संमती !

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम २०१६ द्वारा दाभोळ खाडीचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून समावेश केला आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलमार्ग २८ म्हणून ओळखले जाईल.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकर यांच्या विचारांचे जागरण

सावरकरांनी जातींमध्ये विभागलेला हिंदु समाज एक होण्यासाठी केलेले कार्य, अंदमानात सहन केलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत केलेले सामाजिक कार्य, विज्ञान विचार, नाट्य, साहित्य लेखन याविषयी स्पर्धकांनी विचार मांडले.

चिपळूण येथे ‘लोटिस्मा’त साजरा होणार छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा

३५० वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र रायगडावर जसा राज्याभिषेक झाला, तसाच राज्याभिषेक सोहळा होणार असून या उत्सवात सर्वांनी पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

परशुराम घाटातील महामार्गाची एक दुपदरी मार्गिका ३१ मेपर्यंत चालू होणार !

येत्या पावसाळ्यात परशुराम घाटात वाहतूककोंडी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मागील २ वर्षे पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता.

शासनाने आंबा बागायतदारांना कर्जमाफी द्यावी ! – प्रकाश साळवी, आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष

आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला असून शासनाने बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी समस्त आंबा बागायतदारांच्या वतीने करण्यात येत आहे.

रत्नागिरीत रांगोळीतून साकारले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग !

रंगावलीतून ‘साक्षात् वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत’, असा भास होतोय, असे गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उपाख्य मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले.

पथनाट्यातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकांचे शौर्य !

अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा आणि पथनाट्यातून उलगडली.