निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण मंडळाचे काम हे पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन ! – लेखक धीरज वाटेकर

पर्यावरणाच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आला आहे. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात असलेली अनास्था न्यून करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिले पाहिजे.

 कोकण रेल्वेमार्गावर ५ जूनपासून ‘वन्दे भारत एक्सप्रेस ’ चालू होणार

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्याला ६ दिवस चालवण्यात येणार आहे. मडगाव, थिविम्, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, मुंबई सी.एस्.एम्.टी. या स्थानकांवर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ थांबेल.

चिपळूण बहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचे काम चालू !

वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसे सैनिकांनी महामार्ग विभागाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली.

हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे  धर्मांधाला विकलेली गाय मूळ हिंदु मालकाकडे परत !

हिंदुत्वनिष्ठ युवकांनी मालकाला ‘त्या गायीचे पुढे काय होते ? गोवंश कसा संपत चालला आहे ? आणि त्याला आपणच त्याला कसे कारणीभूत आहोत ?’, याविषयी प्रबोधन केले.

दापोली आगारातून शिर्डी, अक्कलकोट, अंबाजोगाई परळी वैजनाथ या बससेवा त्वरित चालू कराव्यात !

दापोली तालुक्यातील नागरिकांना जाण्या-येण्यास नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, येथील बससेवा कायमस्वरूपी चालू करण्यात यावी.

सप्तबंदीचे म्युरल आणि रत्नागिरीचा इतिहास लिहिला जातोय ! – अधिवक्ता बाबा परुळेकर

सावरकर म्हणाले होते,  ‘कितीही संकटे येऊ देत, जोपर्यंत बुद्धी, वाणी आणि लेखणी या गोष्टी माझ्यापाशी आहेत, तोपर्यंत कुणीही मला भारतमातेला मुक्त करण्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाहीत.’

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल  ! – मंत्री मंगलप्रभात लोढा

देशाच्या संरक्षणासाठी सावरकरांनी योगदान दिले. त्यांनी परदेशांतून पिस्तुले पाठवली. त्यातील एक पिस्तूल हुतात्मा कान्हेरे यांना मिळाले. त्यांनी जॅक्सनचा वध केला. त्याचा शोध घेतांना सावरकांनी हे पिस्तूल पाठवल्याचे लक्षात आले.

रत्नागिरीत आज शोभायात्रा आणि सहभोजनाने होणार सप्ताहाची सांगता !

सर्व कार्यक्रमांना सावरकरप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटनांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

भाट्ये (रत्नागिरी) येथे वाळूशिल्पातून वीर सावरकरांना अभिवादन !

भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार अमित पेडणेकर यांनी साकारले आहे. हे शिल्प पहाण्याकरता भाट्ये समुद्रकिनार्‍यावर शेकडो लोकांनी गर्दी केली.

भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने आश्वासक वाटचाल ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा  

हिंदु शक्ती मोठी होणार. हिंदुत्वाचा विचार जोर धरतोय आणि भारत हिंदु राष्ट्र होणार आहे, असे बोलून ठेवले आहे. भारताची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.