पती आणि पत्नीचे हात पाय बांधून ६७ लाख रुपयांचा ऐवज लुटला
असुरक्षित महाराष्ट्र ! काही अंतरावर पोलीस ठाणे असतांनाही चोरी होणे, हे चोरांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते !

लोणावळा (ता. मावळ) – येथील प्रधानपार्क मधील प्रसिद्ध आधुनिक वैद्य हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर १७ जूनच्या मध्यरात्री २.३० वाजता सशस्त्र दरोडा पडला. १० ते १२ दरोडेखोरांनी धारदार शस्त्राच्या धाकाने आधुनिक वैद्य खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नी विजया यांचे हातपाय बांधत ५० लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने, असा एकूण ६६ लाख ७७ सहस्र ५०० रुपयांचा ऐवज लुटला. लोणावळा पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. सर्व चोर हे पंचवीशीतील तरुण, उंच आणि हिंदी बोलणारे आहेत, अशी माहिती तक्रारदार आधुनिक वैद्य खंडेलवाल यांनी दिली. पद्धतशीरपणे रेकी करत हा दरोड्याचा प्रकार घडला असून चोरांचे वर्णन, सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास चालू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.
पोलिसांची गस्त कमी झाली असून, चोरीच्या घटना वाढत आहेत. लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचार्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्याकडे केली आहे.
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती