आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे (‘ए.आय.यू.डी.एफ्.’चे) आमदार अमिनुल इस्लाम यांनी ‘औरंगजेबाने अनेक मंदिरांना भूमी दान केली होती. तसेच अन्य मोगल शासकांनीही मंदिरे आणि पुजारी यांच्यासाठी भूमी दान केली होती. यांतील कामाख्या मंदिर हे एक आहे’, असा दावा केला. या दाव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ‘अमिनुल इस्लाम यांनी पुन्हा असे वक्तव्य केल्यास, त्यांना कारागृहात जावे लागेल’, अशा प्रकारे कडक शब्दांत सुनावले आहे. तसेच ‘माझ्या काळात आपली सभ्यता आणि संस्कृती यांविरुद्धची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. कारागृहाच्या बाहेर रहायचे असल्यास ते अर्थशास्त्रावर बोलू शकतात, तसेच्या आमच्यावर टीकाही करू शकतात. कामाख्या, शंकरदेव, बुद्ध, महावीर जैन आणि महंमद पैगंबर यांना यामध्ये कुणीही ओढू नये’, असेही म्हटले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केलेले विचार ऐकून प्रत्येक हिंदूला त्यांच्याविषयी गर्वच वाटला असणार. मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या टीकेसाठी उघड उघड चेतावणी देणारे धर्माभिमानी मुख्यमंत्री हे देश आणि धर्म यांसाठी भूषणावहच ! ‘असे धर्माभिमानी मुख्यमंत्री प्रत्येक राज्याला हवेत’, असाच विचार प्रत्येक हिंदूच्या मनात आला असणार, हे नक्की. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे ‘काळ हिंदु राष्ट्राच्या दिशेने जात आहे’, असा विचार कुणाला वाटल्यास चूक नाही. हिंदु लोकप्रतिनिधींमध्ये हे धैर्य येणे, ही हिंदु राष्ट्राची नांदीच म्हणावी लागेल. स्वतःवर टीका केली तरी चालेल; परंतु कोणताच धर्म अथवा देवता यांच्यावर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही, यातून त्यांच्यात असलेला धर्माभिमान लक्षात येतो. धर्मांध करत असलेल्या हिंदूंवरील कुरघोडीविषयी सर्वत्रच्या हिंदू लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे भूमिका घेणे अपेक्षित आहे. धर्मांधांनी स्वातंत्र्यापूर्वी हिंदूंवर अत्याचार तर केलेच; परंतु आता त्या अत्याचाराविषयी न बोलता तेव्हाही परकीय आक्रमक कसे चांगले वागले होते, हे आताच्या पिढीवर बिंबवण्याचा चालू असलेला प्रयत्न घातक आहे.
हिंदु धर्माची महानता शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. प्रत्येक हिंदूने धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेले अत्याचार न विसरता आणि आता अल्पसंख्यांक करत असलेले वैचारिक किंवा कृतीच्या स्तरावरील अत्याचार त्याच वेळी थांबवणे आवश्यक आहे. अशी भूमिका घेतल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही.
– वैद्या (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.