आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील उखडलेले शिवलिंग आणि त्रिशूळ हिंदूंनी पुन्हा स्थापित केले !

गौहत्ती (आसाम) – आसाममधील कछार जिल्ह्यातील कटीगोरामधील महादेव टिला येथील शिवलिंग आणि त्रिशूळ ख्रिस्त्यांकडून उखडण्यात आले होते. तसेच त्यांनी येथील वडाचे विशाल झाडही कापले होते. आता हिंदु रक्षा दल, हिंदु छात्र संघ आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे पुन्हा शिवलिंग स्थापन करून पूजा-अर्चना करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच येथे वडाचे नवीन रोपही लावण्यात आले आहे.

खासी समुदाय हा कछार जिल्ह्यातील उत्तर बरेलीतील टेकड्यांच्या पायथ्याशी रहातो. या समुदायातील बहुतांश लोकांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला आहे. येथील हिंदूंनी केलेल्या आरोपांनुसार खासी समुदायातील ख्रिस्ती बनलेल्या लोकांनी वरील प्रकार केला.