आगरा येथील ‘मुगल रोड’चे ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ असे नामांतर !

आगरा (उत्तरप्रदेश) – आगरा शहरातील ‘मुगल रोड’चे नाव पालटून आता ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ करण्यात आले आहे. यासह ‘सुल्तानगंज की पुलिया’ या भागाचे नाव पालटून आता ‘विकल चौक’ असे करण्यात आले आहे. स्थानिकांच्या मागणीनंतर हा पालट करण्यात आला आहे. (स्थानिकांनी मागणी कशाला करायला हवी होती ? प्रशासनाला हे कळत नव्हते का ? – संपादक)