सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली खड्डे बुजवण्याचा देखावा !

साधे खड्डेही नीट बुजवू न शकणारे सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासन शहराचा कारभार कसा हाकत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

पिंपरी परिसरामध्ये ७ मासांमध्ये ७४६ अपघात; १७६ जणांचा मृत्यू !

जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! अजून किती अपघात आणि मृत्यू झाल्यानंतर प्रशासन रस्ते चांगले करणार आहे ?

निकृष्ट रस्त्यांचा अहवाल प्राप्त होऊनही कारवाई नाही !

निकृष्ट रस्त्यांचे अहवाल प्राप्त होऊनही कारवाई न होणे, हे प्रशासनाने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठल्याचे उदाहरण !

२५ ऑगस्टपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरणार ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे २५ ऑगस्टपूर्वी बुजवण्यात येतील. २६ ऑगस्ट या दिवशी कोकणातील आमदारांसह रस्त्याची पहाणी करण्यात येईल.

भिवंडी येथे खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू !

नागरिकांचे मृत्यू होऊनही रस्ते दुरुस्त न होणे प्रशासनाला लज्जास्पद !

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील खड्डे लोकसहभागातून बुजवले !

येथील रिक्शाचालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून हे खड्डे बुजवल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तूर्तास मिटला असला, तरी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

रस्त्यांच्या कामांचे दायित्व कुणाचे ?

राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस चालू झाल्यावरच रस्त्यांवर खड्डे दिसू लागले. यातून काही मासांपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा नेमका कसा होता ? हे आता सर्वांच्या समोर आले आहे.

पहिले पाढे पंचावन्न !

‘आगामी काळात त्यांचे तांडव पहायला मिळू शकते’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्याचे रौद्ररूप पहाण्याची वेळ ओढवून घेण्यापेक्षा वेळीच जागे होण्यातच शहाणपण आहे. निसर्गरक्षणाचा संकल्प करून कृती केली, तर निसर्गदेवही आशीर्वाद दिल्याविना रहाणार नाही !

रस्ते, खड्डे आणि सामान्यांचे हाल !

रस्ते, पूल,‘सब वे’ यांची देखरेख हे पालिकेचे दायित्व असून त्यांचे अधिकारी कर्तव्य बजावत नसतील, तर त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे अशा प्रकारांमध्ये काही अधिकारी, ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत खड्ड्यांची समस्या संपुष्टात येणार नाही.

ठाणे येथे खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.