सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

वाईट काळ येत असल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया लवकर करणे आवश्यक !

साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) !

पू. मनीषाताईंनी त्यांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण केले आहे. त्यांची प्रत्येक कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी आणि साधनेला धरूनच असते.

साधकांनो, ‘द्वेष करणे’ या स्वभावदोषामुळे होणारे दुष्परिणाम जाणा आणि तो दूर करण्यासाठी प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवा !

द्वेषाचा विचार मनातून दूर केल्यामुळे इतर स्वभावदोषांच्या विचारांनाही मनात प्रवेश करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मन निर्मळ रहाते. ‘निर्मळ मनातच भगवंताचा वास असतो’, हा विचार वाढतो

मंगळुरू (कर्नाटक) येथील डॉ. प्रणव मल्ल्या यांना सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद (अण्णा) गौडा यांच्या समवेत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. रमानंदअण्णा यांच्याशी भ्रमणभाषवर माझे कधीतरी बोलणे होते. त्या वेळी माझ्यावरील आवरण दूर होत असल्याचे मला अनुभवता येते आणि माझे नकारात्मक विचार त्वरित न्यून होतात.

मानसिक ताण देतो अनेक आजारांना निमंत्रण !

मानसिक ताण आपल्या शरिरातील विविध संस्थांवर कसा विपरीत परिणाम करतो, ते आजच्या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत. हे लक्षात घेऊन सर्वजण निरोगी आयुष्याच्या दृष्टीने केवळ शरिराचेच आरोग्य नाही, तर मनाचे आरोग्य जपण्यासाठीही नक्कीच कार्यप्रवण होतील.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने करून तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणारी कु. अवनी छत्रे (वय २४ वर्षे) !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय  तळमळीने केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अल्पावधीत अवनीचे त्रास न्यून झाले. गुरुकृपा, संतांचा चैतन्यमय सहवास आणि मार्गदर्शन अन् साधकांच्या शुभेच्छा यांचा तिला लाभ झाला. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. अतुल दिघे यांना शिकायला मिळालेले सूत्र

‘तुम्ही जी सेवा करता, तिला किती वेळ लागतो ?’, याचा अभ्यास करा. ‘कुठल्या स्वभावदोषांमुळे सेवेला अधिक वेळ लागतो ?’, ते शोधून त्यावर स्वयंसूचना घ्या.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसंगातून ‘अहंभावाने केलेली चांगली कृतीही देवाला आवडत नाही’, हे शिकवल्यामुळे अहं निर्मूलनाचे महत्त्व मनावर बिंबणे

‘अहंभावाचा पूर म्हणजे देवापासून दूर’, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. बर्‍याच वेळा साधकांचे सेवा (कार्य) करण्याकडे पुष्कळ लक्ष असते; मात्र ते स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सातत्याने प्रयत्न करणार्‍या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव आणि दृढ श्रद्धा असणार्‍या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता खेमका (वय ६३ वर्षे) !

या भागात पू. (सौ.) सुनीता खेमका यांनी साधना चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना लाभलेले श्री गुरूंच्या भेटीचे अविस्मरणीय क्षण, संतांचे आशीर्वाद आणि संतपद घोषित होणे’, हा भाग पहाणार आहोत.