‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा आमच्यामध्ये झालेले संभाषण येथे दिले आहे.
श्री. अतुल दिघे : ‘आजकाल मला ‘काळ पुष्कळ शीघ्र गतीने पुढे सरकत आहे’, असे जाणवते; मात्र मी ती गती पकडू शकत नाही. त्या गतीने माझी साधना-सेवा होत नाही. त्यासाठी मी काय करू शकतो ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘तुम्ही जी सेवा करता, तिला किती वेळ लागतो ?’, याचा अभ्यास करा. ‘ती सेवा किती वेळेत व्हायला हवी ?’, हे तुम्ही तुमच्या सेवेचे दायित्व असणार्या साधकाला विचारा. त्यानुसार ‘कुठल्या स्वभावदोषांमुळे सेवेला अधिक वेळ लागतो ?’, ते शोधून त्यावर स्वयंसूचना घ्या.’
– श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.