सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांची अचानक पहाणी करा ! – मयुर घोडके, शहरप्रमुख, शिवसेना

रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

कोरोनाच्या काळात सावंतवाडी नगरपरिषदेकडून पत्रकारांसाठी १० खाटा राखीव ठेवणार ! – संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी

सावंतवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने आज कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

लस घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे पुष्कळ महत्त्वाचे आहे; पण रक्तदान करून दुसर्‍याला सुरक्षित करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मळेवाड, रेडी आणि कासार्डे या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका देण्याची मागणी

मळेवाड, रेडी आणि कासार्डे या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत आहेत.

गोव्यात प्रवेश करण्यास अडवल्याने सिंधुदुर्गातून गोव्यात कामाला जाणार्‍यांनी पत्रादेवी येथे वाहतूक रोखली

परराज्यातून गोवा राज्यात येणार्‍यांसाठी कोरोना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.

गोव्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी १५ मेपासून कोरोना लसीकरण

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या ३२ सहस्र डोसचा पहिला हप्ता १३ मे या दिवशी प्राप्त झाला आहे.

गोव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण घटून ३५.१६ टक्के

‘गोवा फॉरवर्ड’ची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ‘नोडल’ अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी तक्रार

प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासंबंधी उपाययोजनांची न्यायालयाला माहिती

गोमेकॉतील अत्यवस्थ रुग्णांना गोमेकॉच्या सूपरस्पेशालिटी विभागात स्थलांतर करण्यात येत आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतरही गोमेकॉत १२ मेच्या रात्री २ ते १३ मे सकाळी ६ या वेळेत १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहून आम्ही हतबल झालो, आमचे प्रयत्न अपयशी ठरल्याविषयी खंत व्यक्त करतो

कोरोनावर देशी दारूचा उपाय सांगणार्‍या शेवगाव (नगर) येथील आधुनिक वैद्याला नोटीस

कोरोनावर देशी दारू हा उपाय असल्याचे सांगत ५० हून अधिक रुग्ण बरे केल्याचा दावा करणारे डॉ. अरुण भिसे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.