गोव्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी १५ मेपासून कोरोना लसीकरण

पणजी – गोव्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी १५ मेपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. ही लस राज्यात ३५ केंद्रांच्या माध्यमातून विनामूल्य दिली जाणार आहे. यासाठी संबंधितांनी ‘कोवीन’ पोर्टलवर नावनोंदणी करावी. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. गोवा शासनाला पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूटकडून

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या ३२ सहस्र डोसचा पहिला हप्ता १३ मे या दिवशी प्राप्त झाला आहे.